Header

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

baramati accident two killed in baramati indapur road accident

वालचंदनगर/इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – Baramati Accident | टेम्पोला जोडलेला मिक्सरचा रॉड तुटल्याने मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात (Baramati Accident) दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात वालचंदनगर (Walchandnagar) येथील बारामती-इंदापूर राज्यमार्गावर (Baramati-Indapur State Highway) शुक्रवारी (दि.3) सकाळी नऊच्या सुमारास अंथुर्णे गावाजवळ झाला. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दिनकर कांबळे (वय-56) व राजेंद्र बाळु अडकिते (वय-55 दोघे रा. रुई, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अतुल अशोक कांबळे यांनी वाचलचंदनगर पोलीस ठाण्यात (Wachalchandnagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक जॉकी पोपट कांबळे (रा. अंथुर्णे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागामध्ये बांधकाम व्यावसायिक किंवा ठेकेदार इमारतीचा स्लॅब टाकण्यासाठी मिक्सरचा वापर करतात. मिक्सर हा टेम्पो किंवा पिकअप वाहनाला ट्रॉलीसारखा जोडून त्याची वाहतूक केली जाते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास अंथुर्णे गावाजवळ बारामती-इंदापूर
राज्यमार्गाने जॉकी कांबळे हा टेम्पोला जोडलेला मिक्सर घेऊन अंथुर्णेच्या दिशेने चालला होता. अंथुर्णे गावच्या
जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोला जोडलेल्या मिक्सरचा रॉड (Mixer rod) तुटला. त्यामुळे मिक्कस
पाठीमागून येत असलेल्या अशोक कांबळे व राजेंद्र अडकिते यांच्या दुचाकीला मिक्सर धडकला. यामध्ये दोघे
गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे (API Birappa Lature) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे (PSI Atul Khandare) करीत आहेत.

Web Title : baramati accident two killed in baramati indapur road accident

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

The post Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article