Header

Crime News | पोटात 42 लाखाचे सोने लपवून दिल्लीला निघाला होता ‘तस्कर’, विमानतळावर ‘गोत्यात’

Crime News | पोटात 42 लाखाचे सोने लपवून दिल्लीला निघाला होता ‘तस्कर’, विमानतळावर ‘गोत्यात’

crime news cisf and custom officer caught a man with 900 gm gold.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  Crime News | इम्फाळ विमानतळावर सीआयएफएफ आणि कस्टमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी एका मोठ्या सोने तस्कराला अटक केली आहे. हा तस्कर सुमारे 900 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे सोने ज्याची किंमत जवळपास 42 लाखापेक्षा सुद्धा जास्त आहे, ते पोटातील मलाशयात लपवून घेऊन जात होता, जे पोलिसांनी जप्त (Crime News) केले आहे.

मलाशयात लपवले होते सोने
हा तस्कर इम्फाळहून दिल्लीला जाणार होता. त्याने सुमारे 908.68 ग्रॅम वजनाची सोन्याची पेस्ट असलेली चार पॅकेट आपल्या मलाशयात लपवली होती.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

एक्स-रेमधून समजले
अटक आरोपीचे नाव मोहम्मद शरीफ आहे. आरोपी प्रवाशी केरळच्या कोझीकोडीचा राहणारा आहे. तो दुपारी 2:40 मिनिटाच्या विमानाने इम्फाळहून दिल्लीला निघाला होता. अधिकार्‍यांनी सांगितले की, आरोपीला सुरक्षा होल्ड एरियात नेण्यात आले परंतु तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.

यानंतर त्याची मेडिकल केली असता शरीराच्या खालच्या भागात मलाशायात गोल्ड पेस्ट पाहून अधिकार्‍यांनाही धक्का बसला. यानंतर त्याने आरोप मान्य केला. इम्फाळमध्ये सोन्याच्या काळाबाजार नेहमीच सुरू असतो. यापूर्वीसुद्धा 18 जूनला, इम्फाळहून एका अज्ञात वाहनात 43 किलो सोने पकडले होते, ज्याची किंमत सुमारे 21 कोटी होती. यामध्ये सोन्याची 260 बिस्किट पकडली (Crime News) होती.

web title: crime news cisf and custom officer caught a man with 900 gm gold.

Pune Crime | पुण्याच्या धानोरीत थरार ! चोरट्याने पळून जाताना 2 पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा; जखमीच्या मणक्याला 60 % दुखापत, ‘कमांड’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्याला पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी सीबीआयने केली अटक

Tehsildar Appointment | पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

The post Crime News | पोटात 42 लाखाचे सोने लपवून दिल्लीला निघाला होता ‘तस्कर’, विमानतळावर ‘गोत्यात’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article