Header

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

e shram e shram website registration if you want to take money directly in bank account then make this special card

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – e-SHRAM | केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांसाठी एक उपक्रम सुरूकेला आहे, ज्याचे नाव e-SHRAM कार्ड आहे. ई-श्रम एक सरकारी पोर्टल आहे, जिथे संघटित क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना स्वताला रजिस्टर करायचे आहे. यातून सरकारकडे या कामगारांचा एक डेटा तयार होईल आणि त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू होतील आणि योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहचवता येईल. यातून कोविड-19 सारख्या कोणत्याही राष्ट्रीय संकटाच्या वेळी डीबीटीच्या माध्यमातून आर्थिक मदत थेट कामगारांच्या बँक खात्यात पोहचवली जाईल.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

e-SHRAM पोर्टलवर कोण-कोण लोक कशाप्रकारे रजिस्टर करू शकतात आणि याचा कोणता फायदा होणार आहे, याबाबत जाणून घेवूयात…

बँक खात्यात येतील पैसे
सरकार कोविड-19 सारख्या कोणत्याही राष्ट्रीय संकटाच्या वेळी लोकांच्या खात्यात थेट पैसे पाठवते. आता सरकार या पोर्टलवर रजिस्टर लोकांसाठी अनेक योजना आणणार आहे, ज्याचा फायदा रजिस्टर्ड लोकांना मिळेल. जर तुम्ही सुद्धा असंघटित क्षेत्रात काम करत असाल आणि सरकारने एखादी योजना आणली तर याचा फायदा मिळणार नाही. ईपीएफओकडून ई-श्रम पोर्टलला शेयर करण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, यातून आर्थिक मदत थेट खात्यात पोहचवली जाईल.

होतील अनेक फायदे
हे कार्ड बनवल्यानंतर लोकांना सोशल सिक्युरिटी योजनांचा फायदा मिळेल. सरकार असंघटित क्षेत्रासाठी जी योजना आणेल, त्याचा थेट फायदा या कार्ड धारकांना दिला जाईल किंवा ज्या योजना सुरू आहेत, त्यांचा लाभ मिळेल.जेव्हा तुम्ही कार्ड बनवाल तेव्हा तुम्ही कुठून काम शिकलात. जर एखादे ट्रेनिंग घेतले नसेल तर सरकार तुमच्या ट्रेनिंगची व्यवस्था करेल. ज्यातून तुम्ही सहजपणे काम शिकू शकता आणि रोजगार मिळवू शकता.

 e-SHRAM चा कुणाला फायदा मिळेल?
मजूरांपासून (Unorganised Sector workers) हेयर ड्रेसर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मोटर मॅकेनिक किंवा रिक्षा, टपरी चालक आपले कार्ड बनवू शकतात. या कार्ड धारकांना सरकारकडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल.

कसे तयार करावे कार्ड ?
Step-1. कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरच्या सर्चमध्ये e-SHRAM पोर्टल पेजचा अधिकृत वेब अ‍ॅड्रेस – https://www.eshram.gov.in/ टाइप करा.

Step- 2. यानंतर होमपेजवर, ई-श्रमवर नोंदणी करा च्या लिंकवर क्लिक करा.

Step-3. यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन https://register.eshram.gov.in/#/user/self वर क्लिक करा.

Step-4. सेल्फ रजिस्ट्रेशनवर यूजरला आपला आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल.

Step-5. कॅप्चा (captcha) नोंदवा आणि निवडा की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पर्यायाचे सदस्य आहे आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा.

Step-6. नंतर नोंदणी प्रकिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याच्या डिटेल नोंदवा आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा.
eshram.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जवळच्या सीएससीवर जाऊ शकता आणि बायोमेट्रिक पडताणी प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करू शकता.

Web Title : e shram e shram website registration if you want to take money directly in bank account then make this special card

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Bank Jobs | पदवीधर तरूणांना बँकेत नोकरीची संधी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या

The post ‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article