Header

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

pune crime samarth police arrest three in cheating case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | त्याने आठवडाभरासाठी इलेक्ट्रीक बाईक भाड्याने घेतली. त्यानंतर त्यांनी त्या बाईक अतिशय कमी किंमतीला परस्पर विकून टाकल्या. मात्र, या चोरट्यांना माहिती नव्हते की या इलेक्ट्रीक बाईकला जीपीएस लावले आहे. समर्थ पोलिसांनी (Samarth Police) या जीपीएसद्वारे बाईकचा माग काढून चोरट्यांना ताब्यात घेऊन बाईक जप्त (Pune Crime) केल्या आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अरीश रेमंड धवर (वय ३१, रा. लक्ष्मी रेसिडेंसी, पठारे वस्ती, लोहगाव), अंबरेश शांतनूर बिदनूर (वय ३३, रा. पठारे वस्ती, लोहगाव) आणि नरेंद्र विजय पुरुड (वय ३७, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नरेंद्र पुरुड याचे नाना पेठेत नरेंद्र मोटर्स या नावाने दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान चालवितो.
धानोरी येथील श्राईड इंडिया प्रा. लि. या दुकानातून तिघांनी १६ ऑगस्ट रोजी भाड्याने ३ इलेक्ट्रिक बाईक घेतल्या होत्या. दुकान मालकाने आठ दिवसांसाठी नाना पेठ येथे त्या भाड्याने दिल्या होत्या. भाड्याची मुदत संपल्यानंतर या बाईक परत करणे आवश्यक असताना त्या परत न केल्याने दुकान मालकाने संबंधित व्यक्तिकडे फोनवर संपर्क केला. तेव्हा त्याने बाईक आज देतो, उद्या देतो, अशी उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर फोन बंद केल्याने फिर्यादीला त्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी २९ ऑगस्ट रोजी समर्थ पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना या इलेक्ट्रिक बाईक नाना पेठेतील पिंपरी चौक येथे प्रत्येकी ८ हजार रुपये किंमतीत परस्पर विक्री केल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच या तीनही बाईकला जीपीएस सिस्टिम असल्याची या आरोपींना माहिती नव्हती. त्यामुळे ते अगदी बिनधास्तपणे बाईकचा व्यवहार करीत होते. वाहनाची खरेदी विक्री करताना शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करुनच व्यापारी व नागरिकांनी व्यवहार करावेत अन्यथा आपली अशाच प्रकारे फसवणूक होऊ शकते, तसेच कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कामगिरी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, उल्हास कदम यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश
भालेराव, पोलीस अंमलदार रणजित ऊबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत
पेरणे, शुभम देसाई, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली आहे.

Web Title : pune crime samarth police arrest three in cheating case

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Rupee against Dollar | भारतीय चलनामध्ये लागोपाठ चौथ्या दिवशी जबरदस्त ‘उसळी’, डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची वाढ; 4 सत्रात 124 पैशांची ‘तेजी’

Pune Corporation | पुण्याच्या नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला 90 वर्षे कराराने जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर

The post Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article