Header

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Gold Price Update | Consumers happy with big fall in gold prices Gold fell to Rs 9926; Learn the new rates of 14 to 24 carat gold

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सोन्याच्या किमतीत सतत मोठी घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली. यामुळे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 10000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. तर चांदी 19000 रुपयांपर्यंत स्वस्त (Gold Price Update) झाली आहे.

इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचा रेट जारी करत नाही. जाणकारांनुसार आगामी दिवसात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते.

सोन्याच्या किमतीत घसरण

या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (24 September) सुद्धा सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली. शुक्रवारी सोन 420 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने स्वस्त होऊन 46274 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. तर गुरुवारी सोने 46694 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

चांदीच्या दरातही घसरण

शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण नोंदली गेली. शुक्रवारी चांदी 378 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 60410 रुपयांच्या स्तरावर बंद झाली. यापूर्वी गुरुवारी चांदी 60788 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली होती.

सोने 99926 रुपयांनी तर चांदी 19570 रुपयांनी स्वस्त

अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9926 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे.
सोन्याने ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आपला सर्वोच्च स्तर गाठला होता.

तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19570 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजीसह व्यवहार होत आहे.
आज अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 6.54 डॉलरच्या तेजीसह 1752.35 डॉलर प्रति औंसच्या दराने होत आहे.
तर चांदीचा व्यवहार 0.02 डॉलरच्या तेजीसह 22.59 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर होत आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

भारतीय सराफा बाजारात (Gold Price Update) शुक्रवारी 24 कॅरेट सोने 46274 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46307 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 42370 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 34692 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

Web Title : Gold Price Update | Consumers happy with big fall in gold prices Gold fell to Rs 9926; Learn the new rates of 14 to 24 carat gold

Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

Relationship | महिलांना आवडत नाहीत ‘गॉसिप’ करणारे पुरुष; ‘या’ 7 सवयी असलेल्या मुलांपासून दूर राहतात मुली; जाणून घ्या

The post Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article