Header

Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | BJP will get another chance in maharashtra former chief minister devendra fadnavis

नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने (BJP Government) प्राधान्य दिले. उर्वरित प्रश्नही सत्ता आली असती तर सोडवले असते. पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

नवी मुंबई (Navi Mumbai) येथे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भाजप सरकारच्या काळात कामगारांच्या प्रश्नांवर कधीही राजकारण केले गेले नाही.
कामगार हिताचे निर्णय घेण्यात आले. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. काही प्रश्न उरले होते.
सत्ता असती तर तेही सोडवले गेले असते.
केंद्र सरकारशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली जाईल,
असे केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
त्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले.
या पोर्टलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 60 लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik), मंदा म्हात्रे (Manda Mhatre), शशिकांत शिंदे (shashikant shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), निरंजन डावखरे (niranjan davkhare) व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Titel :- Devendra Fadnavis | BJP will get another chance in maharashtra former chief minister devendra fadnavis

BJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’

Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’

Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

The post Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article