High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा

नागपूर :बहुजननामा ऑनलाईन – High Court | आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी गत विधानसभा निवडणुकीत मर्यादेबाहेर खर्च केल्याप्रकरणी सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमोर झाली. सुनावणीत आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कारवाईचे काय झाले? अशी विचारणा निवडणूक आयोगाला (election commission) करत शेवटची संधी म्हणून यावर उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ न्यायालयाने (High Court) वाढवून दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी यापूर्वीच न्यायालयाने आठ आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र आयोगाने उत्तर काही सादर केले नाही.
दरम्यान नुकत्याच झालेल्या सुनावणीत आणखी आठ आठवडे वेळ मागितला होता. ती मागणी मात्र न्यायालयाने (High Court) फेटाळून लावली.
तसेच येत्या दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
निवडणूक खर्च
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा २८ लाख रुपये ठरवून दिली होती. मात्र संबंधित समितीला रवी राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केल्याचे आढळून आले. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १०-ए अनुसार पुढे काहीच प्रगती झाली नाही.
Web Title : High Court | what happened action against ravi rana high court asked election commission.
Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा
The post High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा appeared first on बहुजननामा.