Header

Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा

Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा

Amarinder Singh | amarinder singh to meet pm modi may get place at centre government claims bjp leader harjit grewal.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Amarinder Singh |पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्या खांद्यावर केंद्र सरकार (Central Government) मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. काँग्रेसचे (Congress) नेते असणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपच्या एका नेत्याने अमरिंदर सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचा दावा केला आहे.

भाजप नेते हरजीत गरेवाल (Harjeet Garewal) यांनी म्हटले आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांना भेटल्यानंतर कॅप्टन यांना कृषीमंत्री (Minister of Agriculture) ही बनवले जाऊ शकते, असा दावा हरजीत गरेवाल यांनी केला आहे. तसेच कॅप्टन यांना स्वत:ची भूमिका ठरवायची आहे, त्यांची भूमिका कोणीही ठरवू शकत नाही.

भाजप नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगले लोक आणणे आवडते. कॅप्टन यांची पंतप्रधानांसोबतच्या भेटीची बातमी अशा वेळी समोर आली आहे की, जेव्हा पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरु आहे आणि नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पीपीसीसी पदाचा राजीनामा दिला आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

अमरिंदर सिंह आज अजित डोवाल यांच्या भेटीला

सिंह (Amarinder Singh) यांनी बुधवारी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (National Security Advisor Ajit Doval) यांची भेट घेतली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंजाबमधील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
काही वेळापूर्वी अमरिंदर यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली.

अमरिंदर सिंह यांचे स्पष्टीकरण
पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, आपण भाजपमध्ये जाणार नाही, तसेच काँग्रेसमध्येही राहणार नाही असं अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. पंजाबमधील नव्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा झटका मनाला जात आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ना काँग्रेस ना भाजपा असं धोरण निश्चित केले आहे.

Web Title :- Amarinder Singh | amarinder singh to meet pm modi may get place at centre government claims bjp leader harjit grewal.

 

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

The post Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article