Header

Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा?

jan dhan account holders to get insurance modi government will plan check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jan Dhan | जनधन खातेधारकांना (PM Jan Dhan) सरकारकडून मोठी भेट मिळू शकते. मोदी सरकार लवकरच जनधन खातेधारकांसाठी नवीन सुविधा सुरू करणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (PMJDY) सर्व खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात कव्हरचा लाभ मिळू शकतो. सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमाद्वारे विमा कव्हर देण्यावर विचार करत आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अर्थ मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) च्या अंतर्गत PMJDY खातेधारकांचे कव्हरेज ठरवण्याची योजना बनवत आहे.

काय म्हटले मंत्रालयाने?
अर्थ मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, सरकार पंतप्रधान जन-धन योजनेच्या 430 मिलियन खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात कव्हर प्रदान करण्यावर विचार करत आहे.

जाणून घ्या काय आहे योजना?
केंद्र सरकार द्वारे सामाजिक-सुरक्षा अभियानांतर्गत सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) सुरू करण्यात आल्या होत्या.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत जीवन विमा दिला जातो. यासाठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये द्यावा लागतो. याशिवाय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत आकस्मिक मृत्यु आणि पूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत 2 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर दिले जाते.

तुम्ही सुद्धा उघडू शकता जनधन खाते
प्रधानमंत्री जनधन योजनेत खाते पब्लिक सेक्टर बँकांमध्ये उघडले जाते. परंतु प्रायव्हेट बँकेत सुद्धा
आपले जनधन अकाऊंट उघडू शकता. जर तुमच्याकडे एखादे सेव्हिंग अकाऊंट असेल तर ते जनधन खात्यात बदलू शकता.

हे डॉक्युमेंट आवश्यक
भारतात राहणारा कुणीही नागरिक, ज्याचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तो जनधन खाते उघडू शकतो.

जनधन खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन केले जाते. या डॉक्युमेंट्सचा वापर करून जनधन खाते उघडता येऊ शकते.

आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड ही कागदपत्र आवश्यक आहे.

Web Title : jan dhan account holders to get insurance modi government will plan check details

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Jan Dhan खातेधारकांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार लवकर करू शकते घोषणा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article