Header

Changes in 7 Rules | आजपासून ‘या’ 7 नियमांत होणार बदल; थेट खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

Changes in 7 Rules | आजपासून ‘या’ 7 नियमांत होणार बदल; थेट खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

Changes in 7 Rules changes 1st september 2021 pf lpg gas cylinder cheque payment rules and other

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Changes in 7 Rules | आज 1 सप्टेंबर म्हणजेच अनेक आर्थिक नियमांमध्ये होणाऱ्या बदलांचा थेट खिशावर परिणाम होऊ शकतो. आजपासून ईपीएफ (EPFO), चेक क्लिअरिंग (check clearing), बचत खात्यावरील व्याज (interest on savings account), सिलेंडरचे दर (lpg cylinder price) यांसह अ‍ॅमेझॉनसारख्या (amazon services) सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल दिसून येणार आहेत. तर जाणून घेऊ कोणत्या नियमांमध्ये (Changes in 7 Rules) होणार आहे बदल.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पीएफच्या नियमांमध्ये होणार बदल (changes in the rules of PF)
ईपीएफओने (EPFO) ईपीएफधारकांना 1 सप्टेंबरपूर्वी आधारकार्ड युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी (यूएएन) लिंक करावे लागेल असे सांगितले होते.
त्याची मुदत संपलेली असून त्यामुळे आता युएएन आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे एम्प्लॉयर तुमच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या (PF) अकाऊंटमध्ये पैसे क्रेडिट करू शकणार नाहीत.

पीएनबीच्या बचत खात्यावरील व्याज घटणार (Interest on PNB savings accounts will come down)
आजपासून बचत खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजामध्ये पंजाब नॅशनल बँक कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएनबीच्या ग्राहकांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.
याबाबतची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
यापूर्वी बचत खात्यावरील वार्षिक व्याजदर 3 टक्के होता. आता तो 2.90 करण्यात आला आहे.
त्यामुळे या नव्या निर्णयाचा परिणाम नव्या आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे.

चेक क्लिअरिंगचा नियम बदलणार (The rules of check clearing will change)
चेकच्या माध्यमातून आजपासून 50 हजरांपेक्षा जास्तचा व्यवहार करणे थोडे त्रासदायक ठरणार आहे.
कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करण्यास सुरुवात केली आहे.
या महिन्यापासून अ‍ॅक्सिस बॅक पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करणार आहे.

गॅस सिलेंडरच्या किंमती (lpg gas price)
महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमतीत बदल होत असतो. त्यामुळे आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत.
तर धारानौला गॅस सर्व्हिसकडून गॅस वितरणाच्या वेळेत बदल होणार आहे.
नगरसह ग्रामीण भागांमध्ये गॅस वाटपाच्या वेळेत बदल केला आहे.

OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन महागणार (OTT platform subscriptions will be expensive)
अलीकडे OTT प्लॅटफॉर्मचा युझर्स मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मात्र या युझर्ससाठी हि महत्त्वाची बातमी असून आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन महाग होणार आहे.
युझर्सला या सब्स्क्रिप्शनच्या बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये मोजावे लागणार आहेत.
याचाच अर्थ युझर्सला 100 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
तर 899 रुपयांमध्ये ग्राहकांना दोन फोनमध्ये अ‍ॅप सुरू करता येईल.
तसेच, या सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल.
1499 रुपयांमध्ये 4 स्क्रीनवर हे अ‍ॅप चालवता येईल.

अ‍ॅमेझॉन लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ (Increase in Amazon logistics cost)
काही दिवसापासून इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेलही 100 च्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे आजपासून अ‍ॅमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे.
अ‍ॅमेझॉन लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याने 500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये द्यावे लागतील. रीजनल कॉस्ट 36.50 रुपये असेल.

गुगलचे नवे धोरण, अनेक अँप्सवर निर्बंध (Google’s new policy, restrictions on multiple apps)
1 सप्टेंबरपासूनच गुगलचे नवे धोरण लागू होणार आहे.
या नव्या धोरणानुसार चुकीच्या आणि बनावट कंटेंटला प्रमोट करणाऱ्या अँपवर निर्बंध लागू होती.
या संदर्भात गुगलने एक पोस्ट केली.
त्यामध्ये असे म्हंटले आहे की, अँप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापर्यंत वापरण्यात न आलेल्या अँप्सना ब्लॉक करण्यात येईल.
गुगल प्ले स्टोअर्सच्या नियमांना गुगल अधिक कठोर बनवत आहे.
13 सप्टेंबरला गुगल युझर्सला नवा सिक्युरिटी अपडेट मिळेल.
त्यामुळे आधीपेक्षाही गुगल ड्राईव्हचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे.

Web Title : Changes in 7 Rules | changes 1st september 2021 pf lpg gas cylinder cheque payment rules and other

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Changes in 7 Rules | आजपासून ‘या’ 7 नियमांत होणार बदल; थेट खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article