Header

khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’

khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’

Khandala Ghat Accident car overturned and crashed into the valley of khandala ghat saved the young man

खंडाळा : बहुजननामा ऑनलाईन – khandala Ghat Accident | खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरा नजीक कार दरीत कोसळल्याची (khandala Ghat Accident) घटना गुरुवारी सायंकाळी घडली. खोपोलीमधील (khopoli) सामाजिक संस्थेच्या युवकांना कारमधील फुटबॉलपटूला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सागर सुरेश वावळे (Sagar Suresh Wawale) असं या फुटबॉलपटूच नाव आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फुटबॉलचा नाईट सराव करण्यासाठी सागर नेहमी लोणावळा ते खोपोली जात असतो. गुरुवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या मारुती झेन कारमधून जात असताना शिंग्रोबा मंदिरा नजीक त्याच्या कारला पाठीमागून धडक बसल्याचा भास झाला अन क्षणार्धात कार उलटी पलटी होत दरीत कोसळली. या अपघाताची माहिती खोपोली महामार्ग पोलीस आणि येथील स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. रात्र खूप झाली होती. पावसाच्या सारी कोसळत असल्याने कडा निसरडा झाला होता. मात्र अशा परिस्थितीत ही अपघातग्रस्तांच्या टिमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. काळोखात आवाजावर लक्ष केंद्रीत करून त्यांनी सागरचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच जखमी सागरला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. कार पलटी होऊन दरीत कोसळली यामध्ये सुदैवाने सागर जखमी झाला त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय आला. दरम्यान सागरवर खोपोलीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title : Khandala Ghat Accident | car overturned and crashed into the valley of khandala ghat saved the young man

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

The post khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article