Header

Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

Kolhapur Crime | kolhapur police arrested a thief from pune

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Crime | पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात घरफोड्या, वाहनचोरी करुन कोल्हापूरला पळून गेलेल्या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Crime) अटक केली आहे.

गणेश नारायण आदमिले (वय ३४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून मोपेड, एलईडी, मोबाईल असा ८५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांचे पथक कोल्हापूर शहरात गस्त घालत असताना त्यांना राजारामपुरीतील शाहू मील परिसरात एक मोपेडस्वार संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले. त्यांनी या मोपेडस्वाराला अडवून चौकशी केली. तेव्हा त्याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याच्याकडील मोपेड ही चोरीचे असल्याचे आढळून आले. त्याच्याकडील माल त्याने तळेगाव दाभाडे येथून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोल्हापूर पोलिसांनी गणेश आदमिले याला अटक करुन तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आदमिले याच्याविरुद्ध कोल्हापूर, पुणे, मुंबईमध्ये सुमारे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Web Title : Kolhapur Crime | kolhapur police arrested a thief from pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले…

Rajiv Gandhi Science City Pimpri | पिंपरी चिंचवडमध्ये साकारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी, राज्य सरकारचा निर्णय

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली 

The post Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article