Header

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

Pune Crime | wakad police a case has been registered against 14 people for throwing their family in the sand

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime | वाकड येथील एक गलिच्छ घटना घडल्याचे समोर आले आहे. जात पंचायतीतुन घटस्फोट का घेतला नाही म्हणुन कुंटुंबाला जातीतुन समाजबहिष्कृत (Socially excluded) करण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना कायम वाढताना दिसताहेत. तीन वर्षांपासून वाळीत टाकले शुभकार्य आणि नातेवाईकांच्या अंत्यविधीला येण्यास बंदी देखील घातली. हा लाजिरवाणी प्रकार मार्च 2018 ते सप्टेंबर 2021 दरम्यान घडला. या प्रकरणावरुन एका 33 वर्षीय युवकाने याबाबत वाकड पोलिसात (Wakad police) फिर्याद (Complaint) दिली आहे. यावरून जात पंचायतीच्या पंचासह 14 जणांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीचे पत्नी सोबत कौटुंबिक वाद सुरू होते.
हे समजाविण्यासाठी बाजीराव वाघमारे आणि सासरे दिलीप भोरे हे गावचे पाटील, नातेवाईक,
पंच मंडळींसह फिर्यादीच्या घरी आले.
समाजात तुम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही.
इथुन पुढे तुम्हाला कुठल्याही सुख-दु: खात सहभागी होता येणार नाही, कोणीही कुंकु लावणार नाही (समाजबहिष्कृत) असा तोंडी ठराव करुन निघूूून गेले.
नंतर, फिर्याददाराने डिसेंबर 2018 साली कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी दावा दाखल
यानंतर पत्नीने फिर्यादीसह त्यांचे आई-वडील आणि मामावर मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, 29 डिसेंबर 2018 रोजी फिर्यादी लग्नाला गावी गेले असता तुम्हाला वाळीत टाकले असून तुमच्या सोबत संबंध ठेवणाऱ्यांनाही वाळीत टाकले जाईल असे वाळपत्र मैदर्गी (सोलापुर) येथील लग्नात सोडत कुंकु बंदचा ठराव करण्यात आला.
तर, 2019 साली वारजे माळवाडीत चुलत्यांच्या मृत्युंच्या 5 व्या दिवशीच्या तांब्यात पैसे टाकण्याच्या परपंरेस मनाई केली.
14 फेब्रुवारी 2019 रोजी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे मारहाण करुन फिर्यादीचा चष्मा फोडला.
त्यांच्याशी बोलणाऱ्या नातेवाईकांना वाळीत टाकण्याची धमकी दिली. मनुष्य जिवंत असल्याची जिवगंता (वर्गणी) बंद केली.
चुलत बहिणीच्या लग्न पत्रिकेत फिर्यादीच्या वडिलांचे नाव टाकले म्हणून पंचांनी चुलत्यांची सुध्दा वर्गणी घेणे बंद केलेत.

या दरम्यान, याप्रकरणी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन (Complaint) पंचासह 14 जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, जातपंचायतीचे पाटील (पंच) करेप्पा मारुती वाघमारे व त्यांची तीन मुले बाजीराव वाघमारे,
साहेबराव वाघमारे, बाळकृष्ण वाघमारे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहन उगाडे, मनोज सागरे,
विजय सागरे, रामदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णु वाघमारे, अमृत भोरे,
गोविंद वाघमारे या जात पंचायत चालविनाऱ्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
दरम्यान पुराव्या अभावी पोलीस फिर्याद घेत नसल्याने साडेतीन वर्षांपासून हे कुटुंब अन्याय सहन करत होते. मात्र, अखेर वाकड पोलीसांनी (Wakad police) गुन्हा नोंद केला आहे.

Web Title : Pune Crime | wakad police a case has been registered against 14 people for throwing their family in the sand

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

Rajiv Gandhi Science City Pimpri | पिंपरी चिंचवडमध्ये साकारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी, राज्य सरकारचा निर्णय

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

The post Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article