Header

Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार

Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार

Modi Government | union cabinet gives nod start pm poshan scheme provide mid day meal students more 11 2 lakh govt.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi government | मोदी सरकारकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना (PM POSHAN scheme) लागू करण्यात आली आहे. या योजनेनूसार (Modi government) सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत जेवण मिळणार आहे. आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आज झालेल्या मोदी सरकारच्या (Modi government) मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
पीएम पोषण योजने (PM POSHAN scheme) अंतर्गत भारतातील 11.2 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत मिळणार आहे.
आगामी वर्षासाठी ही योजना लागू राहणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने 1.31 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले की, सध्या देशात सुरू असलेल्या मिड-डे मील योजनेची Mid-day meal plan म्हणजेच मध्यान्ह भोजन योजनेची जागा घेणार आहे.
राज्यांच्या सरकारांच्या मदतीने या योजनेची केंद्राकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच यामधील सर्वाधिक वाटा केंद्र सरकार उचलणार आहे.
अशी माहिती मंत्री ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, आजच्या झालेल्या बैठकीत आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत. रेल्वे आणि शिक्षणासंदर्भातही मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कॅबिनेट बैठकीत नीचम-रतलाम रेल्वे मार्गाचे दुहेरी करण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 1096 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. याशिवाट राजकोट-कानानुस रेल्वे मार्गाचाही दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 1080 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. निर्यात वाढविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Modi Government | union cabinet gives nod start pm poshan scheme provide mid day meal students more 11 2 lakh govt.

 

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी

Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

The post Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article