Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले?

सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसले (Manohar Mama Bhosale) (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला करमाळा न्यायालयाने (Karmala Court) 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे 27 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी न्यायाधीश आर. ए. शिवरात्री (Judge R. A. Shivratri) यांच्यासमोर हजर करून त्यास आणखी 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने मनोहर मामाला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, मनोहर मामाकडे (Manohar Mama Bhosale) जमा झालेल्या 44 लाख रुपयांचे अकाऊंट सील केलंय. ही रक्कम कुठून व कशी आणली, याचा तपास करण्यासाठी पीआय सूर्यकांत कोकणे (PI Suryakant Konkane) यांनी त्यांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे. महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसात (Karmala Police) मनोहरमामा अटकेत आहेत. गुरूवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मनोहर भोसले यांच्या छातीत दुखु लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. त्यानंतर रुग्णालयातून डिचार्ज मिळाल्यानंतर त्यांना परत कोर्टात हजर करण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, फिर्यादीला जी चिठ्ठी दिली होती, त्यातील हस्ताक्षर व मनोहरमामा भोसले याचे हस्ताक्षर याचा तपास करायचा आहे. तसेच कपड्यांचीही तपासणी करायची असून, इतर आरोपींनाही अटक करायची आहे. अशाप्रकारे 14 कारणे सांगून पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
Web Title : Manohar Mama Bhosale | where did rs 44 lakh come manohar mama bhosale’s account police investigating.
Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ
Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे
Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी
The post Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले? appeared first on बहुजननामा.