Header

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’

Pune Corporation | 5 to 50 thousand 'rate card' of PMC regional officers for tree cutting! Corruption exposed by corporator Balasaheb Oswal in pune corporation Standing Committee meeting.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Corporation | झाड कापण्याची परवानगी देण्यासाठी महापालिकेच्या (Pune Corporation) काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ‘रेट कार्ड’ च तयार केले आहे. साधे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नागरिकांकडून 5 ते 50 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा ‘दावा’ नगरसेवकांनी केल्याने आज स्थायी समिती बैठकी मध्ये खळबळ उडाली. मागील वर्षभरात महापालिका अधिकाऱ्यांची लाचखोरीची एकापाठोपाठ एक प्रकरणे उघडकीस आल्यानंतरही असे आरोप होत असल्याने पालिकेचा दर्जा खालावत चालल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

स्थायी समिती मध्ये शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल (shiv sena corporator balasaheb oswal) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका नगरसेविकेने क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या ‘हफ्तेबाजी’चा भांडाफोड केल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली. नागरिक झाडे काढण्यासाठी अथवा फांद्या छाटण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करतात. बरेचदा रिकाम्या प्लॉटवर बांधकाम करताना तेथे असलेली झाडे काढण्यासाठी परवानगी मागितली जाते.

किंवा या प्लॉटवर झाडे नाहीत याबाबत चे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली जाते.
महापालिकेचे निरीक्षक (PMC Inspector) जागा पाहणी करून झाडे काढण्याची अथवा छाटण्याची परवानगी देतात. झाडे काढताना बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच प्लॉटमध्ये झाडे लावण्याच्या अटीवरच परवानगी दिली जाते. यासाठी प्रत्येक झाडांसाठी डिपॉझिटची रक्कमही भरून घेतली जाते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गेली अनेक वर्षे Pune Corporation उद्यान विभागाच्या वतीने या परवानग्या देण्यात येत होत्या. परंतु मागील काही वर्षांपासून या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून क्षेत्रीय कार्यालयांकडे (pmc regional offices) ते देण्यात आले आहेत.
दरम्यान आज स्थायी समिती च्या बैठकीमध्ये नगरसेवक ओसवाल यांनी आज काही क्षेत्रीय अधिकारी ना हरकत प्रमाणपत्रासाठी पैसे मागतात.

यासाठी 5 ते 50 हजार रुपयांचे रेट आकारले जातात. पैसे देण्यास असमर्थता व्यक्त करणाऱ्या नागरिकांना परवानगी न देता त्यांची अडवणूक केली जाते.
यामध्ये शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले काही अधिकारी देखील मागे नाहीत असा आरोप करत काही अधिकाऱ्यांची नावे देखील यावेळी सांगितली

.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेनेही त्यांच्या भागातील रेटकार्ड बाबत गौप्यस्फोट केला. यामुळे बैठकीतील वातावरण गंभीर झाले होते. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विषयावर पडदा पडला.

 

Web Title : Pune Corporation | 5 to 50 thousand ‘rate card’ of PMC regional officers for tree cutting! Corruption exposed by corporator Balasaheb Oswal in pune corporation Standing Committee meeting.

 

Mutual Funds |’या’ पाच Mutual Funds ने 20 वर्षात गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या किती टक्के दिला रिटर्न

Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नका

Pune Crime | पुणे शहरातील 2 अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 41 जणांवर कारवाई

High Court | रवी राणांविरोधातील कारवाईचे काय झाले? उच्च न्यायालयाकडून EC कडे विचारणा

The post Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article