CNG |सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – CNG | सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. सरकारने नॅचरल गॅस (Natural Gas) च्या किमतीत 62 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. नॅचरल गॅसचा वापर खते, वीज उत्पादन आणि सीएनजी गॅस (CNG Gas) गॅस तयार करण्यासाठी होतो.
या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.एप्रिल 2019 च्या नंतर किमतीत ही पहिली वाढ आहे. मानक मानल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय बाजारात दरात तेजी असल्याने गॅसचे दर वाढले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आदेशानुसार पब्लिक सेक्टरमधील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या कंपन्या नामांकनाच्या आधारावर वाटप केलेल्या क्षेत्रातून उत्पादित नॅचरल गॅसची किंमत 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट होईल. CNG
web title: CNG government hikes price of natural gas by 62 percent.
Pravin Darekar | आसमानी संकटाने शेतकरी हवालदील, तरीही सरकारला प्रतीक्षा अहवालाची – प्रवीण दरेकर
The post CNG |सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस appeared first on बहुजननामा.