Header

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

 Pune Corporation | 'Cold War' between Pune Municipal Corporation Standing Committee Chairman and Commissioner is still going on!

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन – Pune Corporation | ‘वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकाची 100 टक्के अंमलबजावणी करा’ हा स्थायी समितीचा आदेश झुगारल्याने स्थायी समितीने आयुक्तांचा निषेध केल्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महापालिकेतील (Pune Corporation) कार्यलयात असुनही महापालिका आयुक्तांनी आज स्थायी समितीच्या बैठकीकडे (standing committee meeting) पाठ फिरवल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्थायी समितीच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात असून यावर्षी अंदाजपत्रका एवढे उत्पन्न मिळेल असा दावा करण्यात आला आहे. आगामी निवडणूक आणि अनलॉक मुळे कोरोनामुळे सुरू केलेली वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकातील ‘स’ यादीतील 100 टक्के कामे करावीत असा आदेश सुमारे सव्वा महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी दिला होता. परंतु उत्पन्न वाढीच्या योजनांची अंमलबजावणी करून प्रत्येक्ष उत्पन्न वाढ झाल्याशिवाय स्थायी समितीच्या (standing committee chairman) आदेशा नुसार काम करणे शक्य नसल्याचे आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी स्पष्ट केले होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

आयुक्तांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पुणे मनपाच्या (Pune Corporation) स्थायी समिती अध्यक्षांनी (standing committee chairman) आयुक्तांचा निषेध करून बैठक तहकूब केली होती. यानंतर मागील आठवड्यात बैठक झाली. पण या बैठकीला आयुक्त आले नाहीत. तसेच आज झालेल्या बैठकीकडे ही आयुक्त विक्रम कुमार यांनी पाठ फिरवली. विशेष असे की आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू असताना आयुक्त त्यांच्या कार्यालयातच उपस्थित होते.

यानिम्मिताने स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यांच्यामधील कोल्ड वॉर अद्याप सुरू असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

Web Title : Pune Corporation | ‘Cold War’ between Pune Municipal Corporation Standing Committee Chairman and Commissioner is still going on!

 

Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

Indian Railways Rules | ट्रेनच्या प्रवासात तिकिटासोबत रेल्वे देते ‘या’ 5 जबरदस्त सुविधा, जाणून घ्या कोणत्या

Investment | FD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक, गुंतवणुकीवर होतो थेट परिणाम; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर 35 वर्षाच्या महिलेचा फाडला गाऊन; पुढं झालं असं काही…

The post Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच ! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article