Header

Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून

Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून

Pune Crime | Murder of youth in loni kalbhor area.

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime | लोणी काळभोरमधील छत्रपती शिवाजी उद्यान येथील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा गळा दाबून खुन (Murder) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे.

विजय ऊर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय २३, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रोहित मोरे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी सांगितले की, विजय मोरे हा खोदकामाचे मिळेल तेथे मजुरी काम करत होता. त्याला दोन वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन होते. विजय हा आईसह रहात होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ व पत्नी, मुलगी रहातात.

विजय रविवारी रात्री साडेदहा वाजता अर्ध्या तासात जाऊन येतो, असे आईला सांगून घराबाहेर गेला होता. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे त्याची आई कांताबाई मोरे यांनी सकाळी रोहित याला सांगितले.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

यादरम्यान, रोहित हा त्याला शोधायला बाहेर गेला तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा विनोद जाधव याने पाण्याच्या टाकीजवळ विजय बेशुद्धावस्थेत पडला असून त्याच्या चेहऱ्यावर रक्त आलेले आहे असे सांगितले.

लोणी काळभोर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी मृत्यु झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Pune Crime | Murder of youth in loni kalbhor area.

 

Pune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा

Sinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर ! कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी; उड्डाणपुलाचे भुमिपूजन नितीन गडकरी गडकरींच्या हस्ते

Solapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी

Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू

The post Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article