Header

Pune Crime | पुण्याच्या धानोरीत थरार ! चोरट्याने पळून जाताना 2 पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा; जखमीच्या मणक्याला 60 % दुखापत, ‘कमांड’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Pune Crime | पुण्याच्या धानोरीत थरार ! चोरट्याने पळून जाताना 2 पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा; जखमीच्या मणक्याला 60 % दुखापत, ‘कमांड’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Pune crime trembling in dhanori of pune rickshaw hit 2 policemen while fleeing 60 of the injured spine injured treatment started at command hospital.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | रिक्षा चोरुन नेत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्याने पोलीस मार्शलच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना जखमी करुन पळून गेला. ही घटना धानोरीतील (Dhanori) भैरवनगर येथील गोकुळनगर भाजी मंडईमागे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता (Pune Crime) घडली.

या घटनेत पोलीस शिपाई दीपक  राजमाने हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश शिरसाट यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. गणेश शिरसाट आणि राजमाने हे धानोरी मार्शल म्हणून मंगळवारी सायंकाळी गस्त घालत असताना एका मुलाने गोकुळनगर (Gokulnagar, Dhanori) भाजी मंडईमागे एक रिक्षा दोन दिवसापासून तेथेच होती. ती तो घेऊन जात असल्याचे सांगितले. हा चोरीचा प्रकार असावा, असे वाटून दोघेही मार्शल घटनास्थळी गेले. राजमाने यांनी रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा केला. तेव्हा त्याने त्याच्या ताब्यातील दुसरी रिक्षा घेऊन तो वेगाने निघाला. दोन्ही पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राजमाने हे रिक्षाच्या समोर येऊन थांबले असताना त्याने राजमाने यांच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. राजमाने यांनी रिक्षाच्या साईड बारला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याने रिक्षा वेगात चालवल्याने राजमाने हे खाली पडून जखमी झाले. गणेश शिरसाट यांनी सरकारी मोटारसायकलवरुन त्याचा पाठलाग केला. तेव्हा त्याने रिक्षाने मोटारसायकलला धडकन देऊन शिरसाट यांना जखमी करुन पळून गेला.

दीपक राजमाने हे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. या घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून मणका 60 टक्के दुखापत झाली आहे. कंमाड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  शिरसाट यांचा पायाला जखम झाली आहे.

 

web title: Pune crime trembling in dhanori of pune rickshaw hit 2 policemen while fleeing 60 of the injured spine injured treatment started at command hospital.

 

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्याला पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी सीबीआयने केली अटक

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

The post Pune Crime | पुण्याच्या धानोरीत थरार ! चोरट्याने पळून जाताना 2 पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा; जखमीच्या मणक्याला 60 % दुखापत, ‘कमांड’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article