Header

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिला पोलिसाचा ‘विनयभंग’; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिला पोलिसाचा ‘विनयभंग’; जाणून घ्या प्रकरण

Pune crime molestation lady police in pune bund gardan police arrest maksud babu shaikh.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime | सिग्नल तोडून जाताना तेथे थांबलेल्या महिला पोलीस हवालदाराला धक्का दिला. त्याचा जाब विचारल्यावर त्यांना अश्लिल शिवीगाळ करणार्‍यास बंडगार्डन पोलिसांनी (Bund Gardan Police) अटक (Pune Crime) केली आहे.

मकसुद बाबु शेख (वय ३२, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षाच्या महिला पोलीस हवालदार यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार मोलेदिना रोडवरील महेश लंच होमजवळ (Mahesh Lunch Home, Pune) बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता घडला. या महिला हवालदार सिग्नल लाल असल्याचे थांबल्या होत्या. त्यावेळी मकसुद हा पाठीमागून मोटारसायकलवरुन आला. सिग्नल तोडून जाताना त्याने फिर्यादी यांना धक्का दिला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याचा जाब फिर्यादी यांनी विचारल्याने राग आल्याने त्याने त्याची गाडी बाजूला घेतली. तू मला विचारणारी कोण असे म्हणून त्यांच्यासोबत वाद घातला. अश्लिल शिवीगाळ (Pune Crime) करुन हावभाव करुन फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेला़ व तुला आता जिवंत ठेवत नाही, अशी धमकी दिली. बंडगार्डन पोलिसांनी (Pune Bund Gardan Police) मकसुद शेख याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime molestation lady police in pune bund gardan police arrest maksud babu shaikh.

 

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल

Honeymoon | ‘हनीमून’दरम्यान जोडप्यासोबत घडली विचित्र घटना, 27 वर्षीय तरूणीला चक्क 10 दिवस अनोळखींसोबत ‘झोपावं’ लागलं

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला एलपीजी सबसिडी मिळत नाहीये? मग करा ‘हे’ काम; त्वरीत जमा होतील पैसे; जाणून घ्या

The post Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिला पोलिसाचा ‘विनयभंग’; जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article