Header

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

gold price update gold silver jewelry price rate update 30th september know latest rate indian sarafa market

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Gold Price Update | सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी (29 September) सोन्याच्या किमतीत 132 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. या तेजीनंतर बुधवारी सोने 46089 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर मंगळवारी सोने 45957 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. तर चांदीच्या किमतीत 368 रुपये प्रति किलोची वाढ नोंदली गेली. या वाढीसह चांदी 59996 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली जी मंगळवारी 59628 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर होती. (Gold Price Update)

सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी स्वस्त

सोने आजही आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 10111 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्टमध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचले होते. (Gold Price Update)

मागील काही दिवसात स्थानिक बाजारात सोने घसरून 45 हजार रुपयांच्या खाली गेले होते. तर यावर्षी 1 जानेवारीला सोने 50,300 रुपयांवर होते. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19984 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1739 डॉलर प्रति औंस आणि चांदी स्थिर भावाने 22.26 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. दोन्हीच्या किमतीत वाढ होऊनही खरेदीसाठी हा योग्य काळ आहे कारण काही दिवसांपूर्वीच किमती खुप कमी झाल्या आहेत. त्या हिशोबाने अजून जास्त वाढ झालेली नाही.

 

web title: Gold price update gold silver jewelry price rate update 30th september know latest rate indian sarafa market.

IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल

Honeymoon | ‘हनीमून’दरम्यान जोडप्यासोबत घडली विचित्र घटना, 27 वर्षीय तरूणीला चक्क 10 दिवस अनोळखींसोबत ‘झोपावं’ लागलं

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला एलपीजी सबसिडी मिळत नाहीये? मग करा ‘हे’ काम; त्वरीत जमा होतील पैसे; जाणून घ्या

Sharad Pawar | ‘सुप्रियानं’ साकारला शरद पवारांचा पुतळा; खा. सुप्रिया सुळेंकडून ‘कौतुक’

The post Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article