Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | गेल्या रविवारी आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर (IPL Cricket Match) सट्टा घेणार्यांवर छापे टाकून गुन्हे शाखेने (Crime Branch) दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) धनकवडीत (Dhankawadi) एका बुकीवर कारवाई करुन त्याला अटक (Pune Crime) केली आहे.
राहुल सुभाष पांडे Rahul Subhash Pandey (वय ४८, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे या बुकीचे नाव आहे़ पांडे याचा ऑनलाईन लॉटरी व्यवसाय (online lottery business in pune) आहे. याप्रकरणी सुशांत फरांदे यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) यांना धनकवडीत आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार भोसले, पोलीस अंमलदार शेंडे, सुळ यांनी धनकवडी येथील हिल व्ह्यु सोसायटीत राहुल पांडे याच्या घरावर छापा टाकला. तेथे आयपीएल सामन्यातील कोलकत्ता नाईट रायरडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर ऑनलाईन बुकिंग (Online Cricket Betting in Pune) घेतले जात असल्याचे आढळून (Pune Crime) आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घरातील बेडरुममध्ये लॅपटॉप, टब व ३ मोबाईलच्या सहाय्याने बुकिंग घेत असल्याचे दिसून आले. मोबाईलच्या गॅलरीमध्ये जुगाराची आकडेवारी (Cricket Betting) असलेल्या हिशोबाचे लॅपटॉपचे स्क्रिन शॉट व जुगाराची आकडेवारी असलेले वहीचे फोटो काढलेले दिसत होते. पोलिसांनी लॅपटॅप, टॅब, ६ मोबाईल, रोख १० हजार ६५० रुपये असा ५१ हजार ८१० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
या ३ मोबाईलवरील सीम कार्ड हे लातूर येथील नागनाथ जाधव, बिबवेवाडीतील योगेश तलरेजा आणि सदाशिव पेठेतील तुषार खालकर यांच्या नावावर असलेले आढळून आले आहे. या तिघांच्या नावाने कागदपत्रे सादर करुन बेटिंगसाठी सीमकार्ड खरेदी केली असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे अधिक तपास करीत आहेत.
The post Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई appeared first on बहुजननामा.