Header

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

Pune News | 60 years old woman killed in leopard attack at rajgurunagar

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajguru Nagar) जवळच्या वडगाव पाटोळे या गावात झोपडीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करुन तिला ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जनाबाई रामचंद्र गडदे (वय 60) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु (Pune News) झालेल्या महिलेचे नाव आहे.

वडगाव पाटोळे येथील बोरदरा -साबळे वस्तीत ही महिला झोपडीत रहात होत्या. मंगळवारी रात्री त्या घरात झोपल्या होत्या. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांचा भाऊ राहतो. बुधवारी सकाळी ते तिच्या घरी गेल्यावर ती दिसून आली नाही. जवळच कोठे गेली असेल असे वाटल्याने त्यांनी चौकशी केली नाही. बराच वेळ झाला तरी जनाबाई कोठे दिसल्या नाही. तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. तेव्हा तिच्या घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर तिचा अर्धवट खालेला मृतदेह आढळून आला. बिबट्याने महिलेचे हात पाय खालेले आढळून आले आहेत. वन विभागाने पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

वडगाव पाटोळे परिसरात गेल्या तीन चार महिन्यांपासून बिबट्याचे सातत्याने ग्रामस्थांना दर्शन होत आहे. बिबट्याने एका दुचाकीस्वारावर हल्ला करुन त्याला जखमी केले होते. लोक शेतात,
कामानिमित्त बाहेर पडायला घाबरु लागले. वन विभागाने काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. त्यात एक बिबट्या अडकला होता.त्यानंतरही लोकांना बिबट्याचे दर्शन वारंवार होत आहे. आता तर बिबट्याने एका महिलेला ठार केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title : Pune News | 60 years old woman killed in leopard attack at rajgurunagar

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे 

The post Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात राजगुरुनगरमध्ये महिला ठार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article