Header

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

CBI Officer Arrest | cbi arrest abhishek tiwari in anil deshmukh clean chit matter

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – CBI Officer Arrest | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लिन चिट देणारा जो अहवाल सोशल मिडियावर फिरत होता, तो सीबीआयच्या कार्यालयातच बनावट अहवाल तयार केला असून याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याच एका अधिकार्‍याला अटक केली (CBI Officer Arrest) आहे. आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आणखी चार ते पाच जणांना याप्रकरणात अटक होऊ शकते, असे सांगतिले जात आहे.

उपनिरीक्षक अभिषेक तिवारी (CBI Arrest Abhishek Tiwari) असे अटक केलेल्या सीबीआय अधिकार्‍याचे नाव आहे. सीबीआयने आज अधिकृतपणे सीबीआयने अभिषेक तिवारी याला अटक केली असल्याचे सांगितले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली असल्याचा अहवाल गेल्या आठवड्यात सोशल मिडियावर फिरत होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान, सीबीआयने हा अहवाल बाहेर कसा आला याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सीबीआयच्या कार्यालयात ज्या संगणकावर हे अहवाल टाईप केले जातात. त्याच संगणकावर व्हायरल झालेला अहवाल टाईप करण्यात आला आहे. मुळ अहवालात फेरफार करुन हा अहवाल तयार करुन त्यानंतर तो व्हायरल करण्यात आला.

सीबीआयने केलेल्या चौकशीत अभिषेक तिवारी याला कोणी तरी आपल्या जाळ्यात ओढले. त्याला लाच देऊन हा अहवाल बनविला असल्याचे सांगितले जात आहे. तिवारी याचे अलाहाबाद येथील बँक खात्यात हे पैसे जमा झाले असून सीबीआयने हे बँक खाते गोठविले आहे. त्याचबरोबर हा अहवाल कोणी व्हायरल केला याचा तपास केला जात असून एका वकिलासह दोघांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अहवाल बाहेर येऊन तो सोशल मिडियावर कोणी कोणी व्हायरल केला याचा तपास केला जात आहे. त्यामुळे या व्हायरल क्लिन चिट प्रकरणात आणखी अनेक घडामोडी घडण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धुराळा उडण्याची शक्यता आहे.

Web Title : CBI Officer Arrest | cbi arrest abhishek tiwari in anil deshmukh clean chit matter

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे

Vegetarian Protein | ‘या’ 10 शाकाहरी गोष्टींत असतं चिकन लेग पीस इतकं ‘प्रोटीन’, आहारात करा समावेश; जाणून घ्या 

The post CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article