Header

Raju Shetty | राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा, म्हणाले – ‘आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार’

Raju Shetty | राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा, म्हणाले – ‘आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार’

Raju Shetty swabhimani shetkari sanghatna raju shetty on ncp sharad pawar vidhan parishad

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Raju Shetty | मागील काही महिन्यापासुन विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्याबाबत संभ्रम सुरु आहे. याबाबत काहीही निर्णय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) अद्याप घेतलेला नाही. राज्य सरकारकडुन अनेकवेळा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे सोपवली आहे. मात्र यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्याचप्रमाणे नुकतंच राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्र देखील दिलं आहे. मात्र त्यामधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नियुक्ती बाबत राज्य सरकारने (State Government) ती शिफारस मागे घेतली आहे. दरम्यान, यावरुन राजु शेट्टी (Raju Shetty)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार असा इशाराच राष्ट्रवादीला दिला आहे.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना राजु शेट्टी (Raju Shetty) म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असं माझं म्हणणं नाही आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाेले आहेत. तसेच, करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन. असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढं बोलताना राजु शेट्टी म्हणाले, तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी राजू शेट्टी यांनी (बुधवारी) पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. याबाबत त्यांनी भाष्य केलं. “मी विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेत नाही. 23 ऑगस्टलाच मी शासनाने महापुरात झालेल्या पिकांच्या नुकसानावर काढलेलं कर्ज माफ करावं अशी मागणी सरकारकडे केलो होती. पूराला आता दीड महिना झाला असून नव्या पिकासाठी पैशांची गरज आहे. जुनं कर्ज माफ झाल्याशिवाय नवं कर्ज मिळणार नाही. त्यानुसार शेतीचं नियोजन करता येईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
अद्याप याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान,आम्हाला ठोस निर्णयाची अपेक्षा असून केंद्राप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलं तर महागात पडेल असा इशारा यावेळी राजू शेट्टींनी दिलाय.
इतक्या उन्हात लोक आमच्यासोबत चालत आहेत ते वेडे आहेत का? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

Web Title : Raju Shetty | swabhimani shetkari sanghatna raju shetty on ncp sharad pawar vidhan parishad

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

The post Raju Shetty | राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा, म्हणाले – ‘आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article