Header

Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन

Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन

ranganath wani shivsena ex mal demise sambhajinagar aurangabad

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी (Rangnath Vani) यांचे बुधवारी (1 सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले (passed away). ते 84 वर्षांचे होते. रंगनाथ वाणी (Rangnath Vani) यांनी 1999 ते 2014 या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघाचे (Vaijapur constituency) शिवसेनेतर्फे (Shivsena) प्रतिनिधीत्व केले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

रंगनाथ वाणी यांच्या पश्चात पत्नी, 4 विवाहीत मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
अल्पशा आजारामुळे त्यांना औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी आमदार रंगनाथ वाणी यांच्यावर वैजापुरातील अमरधाम येथे सकाळी 11 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात वाणी यांनी 1984 ते 1994 या कालावधीत वैजापूरचे नगराध्यक्षपद भूषविले. नांदुर मधमेश्वर (Nandur Madhameshwar) जलदगती कालव्यातुन पाणी आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सलग 39 दिवस आंदोलन केले.
त्याची दखल घेत राज्यपालांनी आंदोलकांची भेट घेतली होती.
त्यांचा प्रशासनावर चांगला वचक होता. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास राहिला.

Web Title : ranganath wani shivsena ex mal demise sambhajinagar aurangabad

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड

LPG Cylinder Price | ‘एलपीजी’ सिलेंडर आजपासून झाला आणखी महाग , आता ‘या’ किमतीत मिळेल घरगुती गॅस; 15 दिवसात 50 रुपयांची वाढ

The post Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article