Sangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या संशयावरून ‘कुणाल’नं भावजय ‘सायली’ला संपवलं

सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Sangli Crime | शेजारील तरुणासोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या कारणावरून दिरानेच भावजयचा खून केल्याची घटना पलूस तालुक्यातील बुर्ली येथे उघडकीस आली आहे. सायली केतन पवार (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे तर कुणाल पवार (वय २८) याला पोलिसांनी अटक (Sangli Crime) केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायली पवार ही शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत चॅटिंग करत असते तसेच ती त्याला भेटलीही होती असा संशय दीर कुणाल याला होता. गुरुवारी रात्री सायली ही बेडरुममध्ये एकटी होती. त्यावेळी कुणालने बेडरूममध्ये जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये सायली मृत्यू चा झाला. दरम्यान, कुणालने घरातील जिन्यावरून सायली पडल्याचा बनाव केला. मध्यरात्री तिला सांगलीतील एका खासगी दवाखान्यात दाखल केले.
डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मृत (Sangli Crime) घोषित करण्यात आलं.
या दरम्यान त्याच रात्री म्हणजे गुरुवारी रात्री कुणालच्या घरा शेजारी राहणाऱ्या श्रेयस पवार या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच रात्री या दोन घटना घडल्याने पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला असता सायली पवारचा खून कुणालने केल्याचे शनिवारी उघडकीस आले. पोलिसांनी कुणालला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला दि २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title : Sangli Crime | Kunal kills sister-in-law ‘Sayali’ on suspicion of ‘chatting’ with neighbor
Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले
Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार
Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस
NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू
The post Sangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या संशयावरून ‘कुणाल’नं भावजय ‘सायली’ला संपवलं appeared first on बहुजननामा.