Header

Ajit Pawar | …तर दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींच्या ‘या’ विधानावरुन अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar | …तर दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींच्या ‘या’ विधानावरुन अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 Ajit Pawar | ajit pawar gave answer to raju shetty over warning on sugarcane.

सातारा :  बहुजननामा ऑनलाईन  –  Ajit Pawar | शेतकऱ्यांना ऊसाची एक रकमी एफआरपी (FRP) मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आक्रमक झाले आहेत. त्यावेळी आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी मागील दोन दिवसापुर्वी दिला होता. या मुद्द्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी ते सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मागच्या वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. राजू शेट्टी (Raju Shetty) त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचं गणित सांगताना अजित पवार म्हणाले, मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर 10 किलोला टनामागे 300 रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरात मध्ये 3 टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना 500 ते 600 रुपये टनाला अधिक भाव मिळतो, साखरेचं पोतं तयार झाले की 1 रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतकऱ्यांच्याच पैशातून दिलं जातं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुढे ते म्हणाले, 15 तारखेला कारखाने सुरु होत आहे, 10 कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज 10 लाख रुपये व्याज सुरु होत आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यांच्या पध्दतीने सागंत आहेत. त्या बाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल, असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी एफआरपीसाठी
येत्या 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती.

त्यावेळी त्यांनी आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावेळी राजु शेट्टी यांनी एफआरपीच्या विषयावरुन राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar gave answer to raju shetty over warning on sugarcane.

 

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

Ramdas Kadam | अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादात शिवसेना मध्यस्थी करणार? कदमांची आमदारकी जाणार?

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

Pune Crime | ‘तू मोठा की मी मोठा’ ! भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून, नुकताच आला होता कारागृहातून बाहेर

The post Ajit Pawar | …तर दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींच्या ‘या’ विधानावरुन अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article