Header

Pune Crime | अंबाजोगाईच्या तरुणाचा पुण्यात सपासप वार करुन खून; प्रचंड खळबळ

Pune Crime | अंबाजोगाईच्या तरुणाचा पुण्यात सपासप वार करुन खून; प्रचंड खळबळ

Pune Crime | Ambajogai's youth stabbed to death in Pune; Huge excitement.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime |पुण्यातील (Pune Crime) हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीत एका युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. खून झालेला तरुण मुळचा अंबाजोगाईचा (Ambajogai) रहिवासी असून याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना (Pune Crime) रविवारी सायंकाळी चार ते सव्वा सहाच्या दरम्यान चुडोबा मंदिराजवळ (Chudoba Temple) चुडोबानगर हिंजवडी येथे घडली आहे.

संतोष विश्वनाथ माने Santosh Vishwanath Mane (वय-38 रा. हिंजवडी मुळ रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी संतोषच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याने सपासप वार करुन त्यांना गंभीर जखमी करत खून (Pune Crime) केला.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ही घटना चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे भरदिवसा घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहे. मात्र, हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके (PSI Tukaram Khadke) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Ambajogai’s youth stabbed to death in Pune; Huge excitement.

 

Pune Cyber Crime | पुण्यातील महिलेचे बँक खाते झाले रिकामे; मेसेजवर संपर्क साधणे पडले महागात

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

Ramdas Kadam | अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादात शिवसेना मध्यस्थी करणार? कदमांची आमदारकी जाणार?

Pune Navratri Mahotsav | गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त पुणे नवरात्रौ महोत्सवकडून आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारक भास्कर कर्णिक यांच्या स्मरकाभोवती सफाई

The post Pune Crime | अंबाजोगाईच्या तरुणाचा पुण्यात सपासप वार करुन खून; प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article