Header

Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले

Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले

pune accident unfortunate horrific accident on shikrapur chakan road the 7 month old baby was crushed by the container along with the parents

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  Pune accident | शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एक भीषण अपघात (Pune accident) झाला आहे. तेथील जातेगाव फाटा येथे भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू (Died) झाला आहे. वडिल अशोक दगडू पवार (Ashok Dagdu Pawar), आई सारिका अशोक पवार (Sarika Ashok Pawar) आणि अनु अशोक पवार (Anu Ashok Pawar) (वय 7 महिने) असं या बाळाचं नाव आहे. या तिघांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. दरम्यान, या अपघातात शुभ्रा अशोक पवार (Shubhra Ashok Pawar) (वय 3 वर्ष) ही जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिक्रापूर-चाकण रस्त्याने (Shikrapur-Chakan Road) चाकण बाजूने अशोक पवार आणि त्याची पत्नी व 2 मुलींसह त्यांच्या ताब्यातील दुचाकी (MH 16 Z. 3606 ) घेऊन जात असताना जातेगाव फाटा येथील न्यू पंजाबी ढाबा हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत होते. यावेळी पाठीमागून चाकण बाजूने आलेल्या कंटेनरची (TS 07 UF 9555) उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. (Pune Accident)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, या धडकेत आई-वडिल, मुले आणि दुचाकी कंटेनरच्या खाली चिरडले गेले.
याप्रकरणी माहिती कळताच शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिंघाचा मृत्यु झाला. 3 वर्षाची मुलगी शुभ्रा ही जखमी अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, कंटेनर चालक बालाजी संजय येलगटे (Balaji Sanjay Yelgate) (रा. अंजनगाव, लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करून त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

web title: Pune accident unfortunate horrific accident on shikrapur chakan road the 7 month old baby was crushed by the container along with the parents.

आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

CNG |सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

The post Pune accident | दुर्देवी ! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात; आई-वडिलांसह 7 महिन्याच्या बाळाला कंटेनरने चिरडले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article