Header

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून ‘विनयभंग’

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून ‘विनयभंग’

Pune Crime | 14 year old girl molested by badminton coach in pune.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुण्यामध्ये (Pune Crime) महिलांवर अत्याचार होणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातील (Pune Crime) बालेवाडी येथे बॅडमिंटन प्रशिक्षकाने (badminton coach) एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅडमिंटन प्रशिक्षकाने 14 वर्षीय बॅडमिंटनपटू (Badminton player) असलेल्या मुलाचा विनयभंग केला. ही घटना समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi police) आरोपीला बेड्या (Accused arrest) ठोकल्या आहेत.

बॅडमिंटन प्रशिक्षक राकेश यशवंत दलाल Rakesh Yashwant Dalal (वय-36 रा. फ्लॅट नं. 301, 3/ई बिल्डींग , नांदे रोड, म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 14 वर्षाच्या मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात 354,354(अ), लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम7 सह 8,9(ओ),10 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश दलालने गेल्या वर्षापासून बॅडमिंटनचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचा विनयभंग केला. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बालेवाडी स्टेडीयम (Balewadi Stadium) येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ही घटना घडली. शनिवारी सकाळी आरोपीने पीडित मुलीला शटल बॉक्स (Shuttle box) हा जिम मधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. तिच्या मागे आरोपी देखील गेला.

त्यानंतर आरोपी राकेशने मुलीसोबत बोलण्यास सुरुवात केली. तू शुक्रवारी खेळायला का येत नाहीस? तू चांगील खेळाडू आहेस, मला तुझा खेळ फार आवडो.
मला तुला फार वरती घेऊन जायचं आहे. तू आज देखील चांगली खेळली आहेस, असे म्हणत राकेशने मुलीकडे शेकहॅन्डसाठी हात पुढे केला. राकेश कौतुक करत असल्याने मुलीने देखील त्याला शेकहॅन्ड केले. तेव्हा राकेशने तिला जवळ ओढत मिठी मारली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु राकेशने मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला, असे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती पीडित मुलीने आईला दिली. त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी राकेश दलाल विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी राकेशला अटक केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | 14 year old girl molested by badminton coach in pune.

 

Kolhapur Crime | ‘हनीट्रॅप’व्दारे सोशलवर बदनामी ! 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Cheating Partner | मोठे पाय असलेले लोक फ्लर्ट करण्यात ‘तरबेज’, ‘या’ साईजच्या ‘पंजा’च्या लोकांपासून जरा सांभाळूनच; जाणून घ्या

CNG Price Pune | पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता CNG त 2 रुपयांनी वाढ भाववाढ; जाणून घ्या नवे दर

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

The post Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून ‘विनयभंग’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article