Header

Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू

Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू

Aadhar Card | aadhaar latest news aadhaar card will be downloaded from one link know here complete process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | आधार कार्ड यूजर्ससाठी कामाची बातमी आहे. UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी (Aadhaar Card) मोठे अपडेट दिले आहे. आता आधार कार्ड हरवल्यास अस्वस्थ होण्याची गरज नाही. युआयडीएआयने आधार डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे आणि यासोबत एक थेट लिंक सुद्धा शेयर केली आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही कधीही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

युआयडीएआयने केले ट्विट

युआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या सुविधेची माहिती दिली आहे. आधार सध्या आपल्या ओळखीचे महत्वाचे कागदपत्र आहे. बँकेचे काम असो की सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज भासते. यामुळे आता आधार सोबत ठेवणे किंवा त्याच्या संबंधी समस्या दूर करू शकता.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Aadhaar Card ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक शेयर करत युआयडीएआयने ट्विट केले की, आपले आधार https://ift.tt/19Jtw5g वरून कधीही कुठूनही डाऊनलोड करा. तुम्ही ‘नियमित आधार’ डाऊनलोड करणे निवडू शकता.

असे करा डाऊनलोड
आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही युआयडीएआयने दिलेली थेट लिंक – eaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा. यानंतर ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करा. यानंतर काही स्टेपचे पालन करून तुम्ही तुमचे आधार डाऊनलोड करू शकता.

ही आहे स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in वर जा.

वेबसाइटवर ‘आधार डाऊनलोड करा’ ऑपशनवर क्लिक करा.

आता आधार/व्हीआयडी/नामांकन आयडीचे ऑपशन निवडा.

Masked आधारच्या ऑपशनवर टिक करा.

येथे काही महत्वाची माहिती नोंदवावी लागेल.

माहिती नोंदवल्यानंतर Request OTP वर क्लिक करा.

रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

हा ओटीपी नोंदवा.

येथे काही आणखी माहिती नोंदवावी लागेल.

ही माहिती नोंदवल्यानंतर ‘आधार डाऊनलोड करा’ वर क्लिक करा.

Masked आधार डाऊनलोड करू शकता.

Web Title :- Aadhar Card | aadhaar latest news aadhaar card will be downloaded from one link know here complete process

Pune Crime | पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून; आंबेगाव बुुद्रुकमध्ये मध्यरात्री घडलेला प्रकार

Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

The post Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article