Header

Eknath Shinde | विरोधकांच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे ‘रोखठोक’ प्रत्युत्तर, म्हणाले – ‘विरोधक 28 नोव्हेंबरला बेनाम दिवस म्हणतात, पण…’

Eknath Shinde | विरोधकांच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे ‘रोखठोक’ प्रत्युत्तर, म्हणाले – ‘विरोधक 28 नोव्हेंबरला बेनाम दिवस म्हणतात, पण…’

Eknath Shinde | Shivsena leader and minister eknath shinde gives answer to bjp leaders allegations in jalgaon

जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत.

मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मुलगा विक्रम याच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आदेश बांदेकर जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे आले आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

यावेळी एकनाथ शिंदे यांनी वधु-वरांना आशीर्वाद दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government) स्थापन होऊन आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

या द्विवर्षपूर्ती निमित्ताने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकेल? याबाबत अनेक दावे करण्यात आले. तसेच भाजप (BJP) नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवही सडकून टीका केली जात आहे. या टीकेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले, 28 नोव्हेंबर हा बेनाम दिवस असल्याचा आरोप विरोधक करतात. परंतु महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक हे म्हणत आहेत. आम्ही आमचं काम करत आहोत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहोत. त्यामुळे कोण काय म्हणतो याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही.

महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याची टीका विरोधकांनी केली.
यावर बोलताना शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, विरोधी पक्ष हे विरोधी पक्षाचे काम करतात. मात्र निवडून देणारे व सत्तेत बसवणारी ही सर्वसामान्य जनता आहे.

आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी जे काही कामे करण्यात आली आहेत.त्यावर सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे कोण काय बोलते याची चिंता आम्ही करत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Web Title :- Eknath Shinde | Shivsena leader and minister eknath shinde gives answer to bjp leaders allegations in jalgaon

Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू

Pune Crime | पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून; आंबेगाव बुुद्रुकमध्ये मध्यरात्री घडलेला प्रकार

Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

The post Eknath Shinde | विरोधकांच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे ‘रोखठोक’ प्रत्युत्तर, म्हणाले – ‘विरोधक 28 नोव्हेंबरला बेनाम दिवस म्हणतात, पण…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article