Header

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Anil parab anil parab will be next bjp leader kirit somaiya and nitesh tweets after anil deshmukh arrest.

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –  Anil Parab | १०० कोटी वसुली प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून (mumbai high court) तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने सोमवारी ते स्वतःहून ईडी कार्यालयात हजार झाले. त्यानंतर त्यांची तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली. यावेळी दिल्लीतून आलेल्या अधिकार्‍यांनीही त्यांची चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजपच्या दोन नेत्यांनी ट्विटरद्वारे मोठा दावा केला. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर असल्याचे म्हंटले आहे.

सोमवारी मध्यरात्री भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि आमदार नितेश राणेंनी (nitesh rane) यासंदर्भात मध्यरात्री ट्विट केली आहेत. सोमय्या यांनी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ट्विट करत ‘अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने (ED) अटक केली. १०० कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब (Anil Parab) असं म्हटलं आहे.

त्या पाठोपाठ मध्यरात्री २ च्या सुमारास भाजप आमदार नितेश राणेंनीदेखील ‘अनिल देशमुख… हॅप्पी दिवाली! अनिल परब.. मेरी ख्रिसमस?? असं सूचक ट्विट केलं आहे. त्याचबरोबर ‘नवाब मलिक आणि संजय राऊतांचे विशेष आभार’, असंही राणेंनी खोचकपणे ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

 

 

 

 

अनिल परब यांच्यावर काय आरोप?

किरीट सोमय्या यांनी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर ईडीनं बजरंग खरमाटे यांना चौकशीचे समन्स बजावले आहे.
खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती ईडीला मिळाली आहे.
त्यामुळे काही दिवसापूर्वीच सोमय्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरू झालेलं आहे, असं विधान केलं होत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

web title: Anil parab anil parab will be next bjp leader kirit somaiya and nitesh tweets after anil deshmukh arrest.

 

Pune Crime | दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटले; पुण्याच्या कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडला प्रकार

Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या

Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता

The post Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article