Pune Crime | दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटले; पुण्याच्या कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडला प्रकार

पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime मध्यरात्री घरी चाललेल्या दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटल्याचा प्रकार कोंढवा येथील खडी मशीन चौकात (kondhwa khadi machine chowk) घडला. या वेळी दुचाकीस्वाराने प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर तलवारीने वार (Pune Crime) करण्यात आले.
या प्रकरणी दिनेश जितलाल यादव (३२, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबरला मध्यरात्री घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर भागात राहतात.
ते मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना ५ अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी घालून त्यांना खडी मशीन चौक येथे अडवले.
त्यांनी तलवारीचा धाक दाखवून फिर्यादीकडील १० हजार रुपये रोख आणि १७ हजार रुपयांचे २ मोबाइल जबरदस्ती हिसकावून घेतले.
त्या वेळी फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला असता, तिघांनी तलवारीने फिर्यादी (Pune Crime) यांच्या हातावर, पायावर मारले. तसेच दुचाकीवरही घाव घातले. कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) अधिक तपास करीत आहेत.
web title: Pune crime the two wheeler was stopped and beaten with a sword the incident took place at khadi machine chowk in kondhwa pune.
Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या
Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम
The post Pune Crime | दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटले; पुण्याच्या कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडला प्रकार appeared first on बहुजननामा.