Header

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar | thackeray government helps param bir singh to escape from india alleges bjp leader and mla ashish shelar.

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन –  Ashish Shelar | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचे आरोप (Allegations of ransom) करुन राज्य सरकारला (Maharashtra Government) अडचणीत आणणारे व सध्या गायब असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या गायब होण्याने भाजपने (BJP) राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी परमीर सिंग गायब होण्यामध्ये राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray government) असल्याचा आरोप केला आहे. तसेच परमबीर सिंग सापडले तर ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडेल. यामागे मोठे कटकारस्थान असल्याचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषदेत परमीबर यांचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारवर (Central Government) आरोप केले होते.
परमबीर रस्ते मार्गे विदेशात गेला असेल तर ज्या राज्यांतून जाऊ शकतो.
त्या राज्यात भाजपची सरकारं आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं होतं.
नवाब मलिक यांचे आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोडून काढले आहेत.

 

परमबीर सिंग महाराष्ट्र सरकारचा जावई आहे का ?

 

आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक हे कपोलकल्पित आरोप करत आहेत. मुळात परमबीर सिंग यांच घर महाराष्ट्रात आहे.
रेशन कार्ड, आधार कार्ड माहाराष्ट्रातील आहे.
मग तो महाराष्ट्रातून पळून कसा गेला, याचं उत्तर राज्यातील सरकारने द्यायला हवं.
महाराष्ट्रात अशी कोणती एजन्सी आहे आणि असे कोण लोक आहेत.
जे परमबीर यांना मदत करत आहेत. परमबीरच्या मार्फत राज्य सरकारनं अशा कुठल्या कारवाया केल्या आहेत की राज्याचे मुख्यमंत्री (CM)
किंवा अन्य कोणताही मंत्री त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही.
परमबीर हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय, असा सवाल शेलार यांनी केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

… तर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार

 

परमबीर सिंगची मालमत्ता का जप्त केली गेली नाही ? लुकआउट नोटीसला (Lookout notice) उशीर का झाला ?
परमबीर पळून जाईपर्यंत राज्य सरकारनं वाट का पाहिली ? अशा कोणत्या गोष्टी ठाकरे सरकारनं परमबीर सिंगकडून करुन घेतल्यात.
ज्या उघड झाल्या असत्या तर अडचण झाली असती.
परमबीर पळून गेलाच असेल तर यास महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) जबाबदार असल्याचे शेलार यांनी म्हटले.

 

तो सापडला तर पितळ उघडं पडेल

 

परमबीर सिंगकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. तो सापडला तर सरकारचं पितळ उघडं पडेल, त्यामुळंच सरकार त्याला पळायला मदत करतंय.
हा एक मोठा डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला. विदेशात त्यांना राजकीय आश्रय मिळावा यासाठीही ठाकरे सरकार प्रयत्न करत असावं.
अशी शंका देखील आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

 

Web Title : Ashish Shelar | thackeray government helps param bir singh to escape from india alleges bjp leader and mla ashish shelar.

 

BJP Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र; म्हणाल्या – ‘तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय’

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

WhatsApp ने बंद केली 22 लाखापेक्षा जास्त अकाऊंट, यूजर्सने कधीही करू नयेत ‘या’ चूका; जाणून घ्या

The post Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article