Header

Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड

Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड

Pune Crime | M.G. Enterprise's Alnesh Somji and wife Dimple Somji remanded for 2 days in Delhi court transit remand.

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Branch Police) खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti extortion Cell) पोलिसांनी दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) ताब्यात घेतले आहे. आरोपींना आज (मंगळवार) सकाळी दिल्ली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ट्रान्झिट रिमांडमध्ये (transit remand) पाठवले आहे. अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुण्यातील अनेकांना वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याच्या बहाण्याने गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. शुक्रवारी (दि.29 ऑक्टोबर) सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. आज या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले. पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले. आज सकाळी सोमजी दाम्पत्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड सुनावले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | M.G. Enterprise’s Alnesh Somji and wife Dimple Somji remanded for 2 days in Delhi court transit remand.

 

Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरण ! सॅम डिसोझाने केला धक्कादायक खुलासा; सुनील पाटीलने पार्टीची घेतली होती माहिती

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

The post Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article