Header

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

Platform Ticket | Good news for mumbai train passengers! Platform tickets now again at Rs 50 to Rs 10 mumbai marathi news

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  –   Platform Ticket | कोरोना काळात लोकांनी गर्दी करु नये, नातेवाईकांना सोडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येऊ नये, यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) १० रुपयांवरुन ५० रुपये केले होते. ते आजपासून पुन्हा पूर्ववत १० रुपये करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना काळात गेल्या दीड वर्षापासून रेल्वे प्रवासावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. आरक्षणतिकीटाशिवाय रेल्वे प्रवास करण्यास मनाई होती. तसेच कंन्फर्म तिकीट असल्याशिवाय रेल्वे स्थानकात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये. प्रवाशांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर आल्यास गर्दी होऊन कोरोना प्रसार वाढीस लागण्याची शक्यता होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

त्यामुळे रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरुन ५० रुपये केले होते. आता कोरानाची लाट ओसरली आहे. पॅसेंजर गाड्याही सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीटाचे (Platform Ticket) दर पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला आहे. आजपासून पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये करण्यात आले आहे. पुण्यासह इतरत्र लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Platform Ticket | Good news for mumbai train passengers! Platform tickets now again at Rs 50 to Rs 10 mumbai marathi news.

 

 

National Apprenticeship Training Scheme | 7 लाख तरूणांसाठी उघडतील रोजगाराचे दरवाजे, ‘ही’ विशेष योजना मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी वाढवली

Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना Tax वाचवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ 4 दावे, अन्यथा होईल मोठे नुकसान

Parambir Singh | कोर्टानं फरार घोषित केलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबईत अवतरले

ST Workers Strike | आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

The post Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article