Header

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा

Indian Railways | good news for passenger train Indian railways resume catering services these trains.

नवी दिल्ली: वृत्तसंस्था  –  Indian Railways | कोरोना संक्रमणामुळे रेल्वेने आपल्या अनेक सेवा बंद केल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये रेल्वेमध्ये (Indian Railways) आता शिजवलेले अन्न (Cooked Food) देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रेल्वेने हि सुविधा पुन्हा सुरु केली आहे. पण, सुरुवातीला हि सुविधा ठराविक ट्रेनमध्येच सुरू करण्यात आली आहे.

 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ट्रेनचे संचालनही बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता कोरोनाची परिस्थिती कमी होऊ लागली आहे.
रेल्वे सुरु झाल्या पण कोरोनाचे संक्रमण नियंत्रित करण्यासाठी आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी ट्रेनमधील अनेक सेवा पूर्णपणे बंद आहेत.
त्यामुळे प्रवाशाना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता, रेल्वेने पुन्हा ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न सुरुवात केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

त्याचबरोबर रेडी टू इट जेवणही मिळेल. Indian Railways ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, देशभरातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि अशा इतर ठिकाणी कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सामान्य रेल्वे सेवा पुनर्संचयित करणे, प्रवासी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वेने केटरींची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला राजधानी, दुरांतो, शताब्दी, तेजस, गतिमान एक्स्प्रेस या गाड्यांमध्येच केटरिंग सेवा उपलब्ध असेल. या ट्रेनमधील प्रवाशांना शिजवलेले अन्न मिळेल. कालांतराने सर्वच ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय, रेडी टू इट सर्व्हिसही सुरू राहणार आहे.

 

Web Title : Indian Railways | good news for passenger train Indian railways resume catering services these trains.

 

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

National Apprenticeship Training Scheme | 7 लाख तरूणांसाठी उघडतील रोजगाराचे दरवाजे, ‘ही’ विशेष योजना मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी वाढवली

Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना Tax वाचवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ 4 दावे, अन्यथा होईल मोठे नुकसान

Parambir Singh | कोर्टानं फरार घोषित केलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबईत अवतरले

The post Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article