Header

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | 88 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona |  पुण्यात कोरोना (Pune Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मृतांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला (Pune Health Department) यश आल्याच्या पहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) केले जात आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात कोरोनाचे 88 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 95 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

शहरात गेल्या 24 तासात 4 हजार 628 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 88 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 36 लाख 68 हजार 781 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 6 हजार 379 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 96 हजार 421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 857 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या (Pune Corona) मृत्यूची नोंद झालेली नाही.
मात्र, शहराबाहेरील तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरात 97 रुग्ण गंभीर आहेत. तर 65 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | 88 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics.

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी

IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन

Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

The post Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article