Header

SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा?

SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा?

ssy ssy scheme you can save daily 1 rupees and get 15 lakh rupee on maturity your daughter should millionaire

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  – SSY | जर तुम्ही गुंतवणूक करण्याचे नियोजन (Investment Planning) करत असाल तर आज आम्ही एक अशा सरकारी योजनेबाबत सांगणार आहोत, जिथे तुम्ही अतिशय कमी पैशात गुंतवणूक करून मोठी रक्कम तयार करू शकता. या सरकारी योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) म्हणजे SSY आहे.

SSY योजनेतून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता, सोबतच गुंतवणुकीच्या या चांगल्या पर्यायात पैसे लावल्याने इन्कम टॅक्स वाचवण्यात सुद्धा मदत होईल. या स्कीमचा लाभ रोज 1 रुपयांची बचत करून सुद्धा घेता येऊ शकतो. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही :

काय आहे सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना (SSY) द्वारे तुम्ही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेत आई-वडिल किंवा पालक या योजनेत मुलीच्या नावावर केवळ अकाऊंट उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत हे अकाऊंट एखाद्या पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडू शकता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

इतक्या रुपयांनी करू शकता गुंतवणूक

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते. सुकन्या समृद्धी खात्यात एका आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा न केल्यास 15 वर्षाच्या कालावधी दरम्यान ती कधीही रेग्युलर करता येणार नाही. यासाठी प्रत्येक वर्षाच्या हिशेबाने 50 रुपये दंड भरावा लागेल.

किती मिळते व्याज?

या योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यावर इन्कम टॅक्स सूट सुद्धा मिळते.

मॅच्युरिटीवर मिळतील 15 लाखापेक्षा जास्त

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

जाणून घ्या कसे उघडावे खाते?

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे. हे अकाऊंट एखाद्या पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडू शकता. कुटुंबातून कमाल दोन मुलींसाठी अकाऊंट उघडता येऊ शकते.

या योजनेत आई-वडील किंवा गार्डियन एका मुलीच्या नावावर केवळ एक अकाऊंट काढू शकतात. मुलीचे वय 10वर्षापेक्षा कमी असावे. सुकन्या समृद्धी अकाऊंट उघडायचे असेल तर यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. तर कमाल तुम्ही 1,50,000 रुपयांपर्यंत जमा करू शकता.

web title: ssy ssy scheme you can save daily 1 rupees and get 15 lakh rupee on maturity your daughter should millionaire.

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

Devendra Fadnavis | फडणवीसांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘नीरज गुंडे यांच्याशी माझे सबंध आहेतच, पण…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’

The post SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article