Header

SSY | रोज 416 रुपये वाचवून भविष्यासाठी तयार करा 65 लाखाचा फंड, जाणून घ्या काय आहे की योजना

SSY | रोज 416 रुपये वाचवून भविष्यासाठी तयार करा 65 लाखाचा फंड, जाणून घ्या काय आहे की योजना

SSY | investment tips daily save money rs 416 and earn 65 lakhs check know this scheme Sukanya Samriddhi Yojana ssy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY | जर तुम्ही गुंतवणुक करण्याची योजना (Investment Planning) आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा सरकारी योजनेबाबत सांगणार आहोत जिथे तुम्ही अतिशय कमी पैशात गुंतवणूक करून एक मोठी रक्कम जोडू शकता. या सरकारी योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) म्हणजे SSY आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) 10 वर्षाच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडता येऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलीसाठी रोज 100 रुपये वाचवून 15 लाख रुपये आणि 416 रुपये वाचवून 65 लाख रुपयांचा फंड उभा करू शकता, जो तिच्या चांगल्या भविष्यासाठी उपयोगी पडेल.

Join our Whatsapp Group
Telegram, and  facebook page  for every update

जाणून घ्या काय आहे सुकन्या समृद्धी योजना
Sukanya Samriddhi Yojana एक अशी दिर्घ कालावधीची योजना आहे, जिच्यात गुंतवणूक करून तुम्ही मुलीचे शिक्षण आणि भविष्याबाबत निश्चिंत होऊ शकता. यासाठी खुप जास्त रक्कम सुद्धा गुंतवण्याची गरज नाही. अगोदर हे ठरवा की मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिला किती रक्कम हवी. याबाबत पूर्ण कॅलक्युलेशन जाणून घेवूयात.

कसे उघडावे खाते
10 वर्ष वयापर्यंत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते. किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. घरातील दोन मुलींसाठी हे खाते उघडता येते. जर जुळ्या असतील तर तिसर्‍या मुलीसाठी सुद्धा योजनेचा लाभ घेता येईल.

कुठे उघडावे खाते
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत अकाऊंट (SSY Account) कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडता येऊ शकते. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर स्कीम मॅच्युअर होईल.

किती करू शकता गुंतवणूक
सुकन्या समृद्धी योजनेत कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. यावर वार्षिक व्याज 7.6 टक्के आहे.

जाणून घ्या कसे मिळतील 65 लाख रुपये

1. आता 416 रुपयांची रोज बचत केली तर महिन्याचे होतात 12,500 रुपये

2. 12,500 रुपये दरमहिना जमा केले तर वर्षाचे झाले 15,00,00 रुपये

3. ही गुंतवणुक केवळ 15 वर्ष केली तर एकुण गुंतवणुक झाली 2,250,000 रुपये

4. 7.6 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशेबाने एकुण व्याज मिळेल 4,250,000 रुपये

5. जेव्हा मुलगी 21 वर्षाची होईल तर स्कीम मॅच्युअर होईल, त्यावेळी एकुण मॅच्युरिटी अमाऊंट होईल 6,500,000 रुपये

कधीपर्यंत हे अकाऊंट राहिल जारी
मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर स्कीम मॅच्युअर होईल. या योजनेत तुमची गुंतवणूक किमान तोपर्यंत लॉक होईल जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची होत नाही.

Web Title :- SSY | investment tips daily save money rs 416 and earn 65 lakhs check know this scheme Sukanya Samriddhi Yojana ssy

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट अलाऊन्सबाबत (HRA) झाला ‘हा’ खुलासा

New Covid-19 Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जारी ! व्हेरिएंटच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

Earn Money | नोकरीसोबत एका छोट्या खोलीत सुरू करा ‘हा’ बिझनेस, खर्चाच्या 10 पट होईल जबरदस्त कमाई

The post SSY | रोज 416 रुपये वाचवून भविष्यासाठी तयार करा 65 लाखाचा फंड, जाणून घ्या काय आहे की योजना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article