Header

Former MLA Mohan Joshi | लसीकरण, निर्बंधांच्या पालनासाठी कॉंग्रेस पुण्यात सक्रीय राहील – माजी आमदार मोहन जोशी

Former MLA Mohan Joshi | लसीकरण, निर्बंधांच्या पालनासाठी कॉंग्रेस पुण्यात सक्रीय राहील – माजी आमदार मोहन जोशी

Former MLA Mohan Joshi | Congress will remain active in Pune for vaccination, compliance with restrictions - Former MLA Mohan Joshi

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Former MLA Mohan Joshi | ओमिक्रॉन संसर्ग (Omicron) रोगाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण, निर्बंधांचे पालन यात पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते सक्रीय राहातील, अशी ग्वाही माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली आहे.

कोविडच्या साथीत राज्य सरकारने सक्षमतेने कामगिरी केली.ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठीही सरकार नियोजनपूर्वक उपाययोजना करीत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी नेहमीच आग्रही राहिले आहेत. पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते शहरातील विविध भागात मोहीम राबवीत आहेतच, ही मोहीम अधिक व्यापक केली जाईल. कोविडच्या पहिल्या लाटेत कॉंग्रेस भवनात मदत केंद्र उघडण्यात आले होते, त्यावेळी रक्ताची गरज लक्षात घेऊन काँग्रेस भवन आणि शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबीरे भरविण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबीरे घेतली होती. याच पध्दतीने काँग्रेस कार्यकर्ते यापुढेही सक्रीय राहून पुणेकरांना दिलासा देणारी कामगिरी बजावतील, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. याबाबत येत्या दोन दिवसात स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात नागरिकांना जाचक ठरणार नाहीत आणि साथीचा अटकाव होण्यास मदत राहील असा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व निर्बंधांचे पालन व्हावे यासाठीही काँग्रेस कार्यकर्ते दक्षता घेतील, नागरिकांचे प्रबोधन करतील, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 


Web Title :-
Former MLA Mohan Joshi | Congress will remain active in Pune for vaccination, compliance with restrictions – Former MLA Mohan Joshi

 

 

WhatsApp वर मिळेल जवळच्या स्टोअर आणि रेस्टॉरंटची माहिती, जाणून घ्या नवीन फीचर

 

Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस

 

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

 

Salman Khan | ‘भाईजान’ सलमान खानला ‘सर्पदंश’ ! 7 तास हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना

The post Former MLA Mohan Joshi | लसीकरण, निर्बंधांच्या पालनासाठी कॉंग्रेस पुण्यात सक्रीय राहील – माजी आमदार मोहन जोशी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article