LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC policyholders IPO | आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) पॉलिसी धारकांना IPO मध्ये भाग घेण्यासाठी अगोदर आपले पॅन अपडेट करावे लागेल. कारण, एलआयसीच्या आयपीओ (LIC policyholders IPO) इश्यू साईजमध्ये 10 टक्केपर्यंत पॉलिसी धारकांसाठी रिझर्व्ह आहे.
एलआयसीने म्हटले आहे की, एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये भाग घेण्यासाठी पॉलिसी धारकांनी चेक करावे की रेकॉर्डमध्ये दिलेल्या पॅनची माहिती योग्य आहे किंवा नाही. तसेच पॅनची माहिती अपडेट करावी.
तर स्वखर्चाने उघडावे डिमॅट अकाऊंट
जर एखाद्या पॉलिसी धारकाकडे सध्या व्हॅलिड डिमॅट अकाऊंट (demat account) नसेल तर त्यास आपल्या खर्चाने उघडण्याचे नियोजन केले पाहिजे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे की, डिमॅट अकाऊंट उघडणे आणि पॅन अपडेट करण्यासाठी जो खर्च येईल तो पॉलिसी होल्डर उचलतील. कॉर्पोरेशन कोणताही खर्च करणार नाही. (LIC policyholders IPO) एलआयसी पॉलिसी धारकांसाठी आपल्या वेबसाइटवर पॅन अपडेट करण्याची जाहिरात करत आहे.
आवश्यक कागदपत्रे
–पॉलिसींच्या यादीसह अपले पॅन कार्ड ठेवा.
–मोबाईल नंबर टाकावा लागेल.
–एलआयसी द्वारे नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
जर तुमचा पॅन कार्ड नंबर LIC च्या डेटाबेसमध्ये नसेल तर असे करू शकता अपडेट
1) एलआयसीची अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा.
2) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा ऑपशन निवडा.
3) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशन पेजवर पुढे जा वर क्लिक करा.
4) ईमेल आयडी, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबरची माहिती भरा.
5) बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका.
6) रजिस्टर्ड मोबाइल नंबरने OTP साठी रिक्वेस्ट करा.
7) ओटीपी मिळाल्यानंतर तो सबमिट करा.
8) फॉर्म जमा केल्यानंतर रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.
पॅन-एलआयसीची तपासणी अशी करा
1) https://ift.tt/3Iarduf वर जा.
2) पॉलिसी नंबर, जन्मतारीख आणि पॅनची माहिती, सोबतच कॅप्चा नोंदवा.
3) नंतर सबमिट बटन दाबा.
Web Title :- LIC policyholders IPO | consumer news how lic policyholders can update their pan to participate in india biggest ipo
EPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या योजना
The post LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा appeared first on बहुजननामा.