Header

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

Web Title :- Pune Crime | Security guard enters Jewelers and steals Rs 12 lakh; He made a hole in the wall and entered the shop, ran away with his wife
पुणे :  बहुजननाम ऑनलाइन – Pune Crime | सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक केलेल्याने दुकानाच्या भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला. ज्वेलर्समधील १२ लाख रुपयांचे दागिने, रोकड चोरुन पत्नीला घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी सुनिल सोमनाथ सोनवणे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी विरेंद्र बहाद्दूर शहा व त्याची पत्नी (रा़ नेपाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनवणे यांचे घुलेनगरमधील आकासिया इमारतीत श्री स्वामी कृपा ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. विरेंद्र शहा याला या इमारतीचा सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले असून तो तेथेच रहात होता. त्याने १ डिसेबर रोजी दुपारी ४ ते २ डिसेंबर सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद असताना पाठीमागील भिंतीला भोक पाडले. त्यातून आत प्रवेश केला. दुकानातील मुख्य लोंखडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. ती न फुटल्याने काचेच्या काऊंटरमधील ६ लाख २ हजार ७०० रुपयांचे १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ लाख ३१ हजार ५० रुपयांचे ७ किलो चांदीचे दागिने आणि ७० हजार ५०० रुपये असा एकूण १२ लाख ४ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरी करुन घेऊन (Pune Crime) गेला. जाताना तो आपल्या पत्नीलाही घेऊन पळून गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Security guard enters Jewelers and steals Rs 12 lakh; He made a hole in the wall and entered the shop, ran away with his wife

 

 

LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

 

EPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या योजना

 

Vijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

 

Common Service Centres (CSC) | डॉक्टरांचा सल्ला आता WhatsApp वर; सरकारने आणली ‘ही’ सुविधा

 

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

The post Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article