Header

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal who carry unlicensed pistol
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Pune criminals) पुणे गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस (Cartridge) जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) अप्पर इंदिरानगर (Upper Indira Nagar) येथे मंगळवारी (दि.28) केली.

जतीन संतोष पवार Jatin Santosh Pawar (वय-19 रा. धायरीगांव, धायरेश्वर मंदिर, खंडाळे-पोकळे कॉर्नर सोसायटी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जतीन पवार हा सराईत गुन्हेगार चैत्रबन आरोग्य कोटीसमोर (Chaitraban Arogya Koti) उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपर इंदिरानगर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन सापडली. मॅगझीन काढून पाहिली असता त्यामध्ये एक जिवंत काडतुस होते. पोलिसांनी आरोपीकडून पिस्टल आणि काडतुस असा एकूण 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे (Datta Sonawane) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे 6 गुन्हे दाखल आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, सतिश भालेकर, अशोक माने, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, अमोन पवार, अजय थोरात, महेश बामगुडे यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal who carry unlicensed pistol

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिलेचा विनयभंग ! डेक्कन पोलिस ठाण्यात वकिलावर गुन्हा दाखल

 

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा

The post Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article