Header

MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

MSEDCL Padmavati Substation | Power supply from alternative system in Padmavati area of Pune on Thursday

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महावितरणच्या पद्मावती विभाग अंतर्गत पद्मावती उपकेंद्रातील (MSEDCL Padmavati Substation) 10 एमव्हीए क्षमतेचे मोठे पॉवर ट्रान्सफॉर्मर (Power Transformer) बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. 30) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पद्मावती, गंगाधाम (Gangadham), बिबवेवाडी (Bibwewadi), मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा (Power Supply) करण्यात येणार आहे. मात्र पर्यायी व्यवस्थेच्या वीजपुरवठ्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यास या भागातील वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता असल्याचे महावितरणकडून (MSEDCL Padmavati Substation) सांगण्यात आले आहे.

महावितरणच्या पद्मावती उपकेंद्रातील (MSEDCL Padmavati Substation) 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे. नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे पूर्वनियोजित काम गुरुवारी (दि. 30) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातील २२ केव्ही उच्चदाबाच्या तीन वीजवाहिन्यांना (22 KV high voltage power line) पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. हा पर्यायी वीजपुरवठा दुरुस्ती कामाच्या कालावधीत सुरळीत राहण्यासाठी महावितरणकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

परंतु तांत्रिक कारणास्तव त्यात बिघाड झाल्यास मात्र त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिबवेवाडी ते गंगाधाम एम्पोरियम,आदिनाथ सोसायटी ते महावीर सोसायटी, कुमार सिद्धांचल, मार्केटयार्ड, महर्षीनगर, वसंतबाग सोसायटी, अटल सोसायटी, सिटी प्राईड (City Pride) परिसरात वीजपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असा प्रसंग उद्भवल्यास वीजपुरवठा बंदच्या कालावधीत ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.

Web Title :- MSEDCL Padmavati Substation | Power supply from alternative system in Padmavati area of Pune on Thursday

Rule Change | 1 जानेवारीपासून LPG सिलेंडरच्या दरापासून डिजिटल पेमेंटच्या नियमापर्यंत होणार ‘हे’ 13 मोठे बदल; जाणून घ्या

Maharashtra Corona Restrictions | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत वाढ ! 2 दिवसांत निर्बंधाबाबत घेणार निर्णय; राजेश टोपेंची माहिती

Maharashtra Police Recruitment | ‘महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदे भरणार’ – गृहमंत्री

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा

Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट

The post MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article