Header

Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

Restrictions in Maharashtra | mumbais positivity rate 848 rajesh tope has-clearly stated about restrictions corona and omicron covid
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Restrictions in Maharashtra | राज्यात कोरोना (Corona Virus) आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटने (Omicran Variant) चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. दैनंदिन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशात 82,000 इतकी कोरोना रूग्णांची संख्या आहे. यातच महाराष्ट्रात देखील कोरोना रूग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या वाढत आहे. आज मुंबईत तर कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्स, मंत्र्यांची बैठक (Restrictions in Maharashtra) घेण्यात आली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘मुंबईत काल 2200 च्या दरम्यान रुग्ण आढळून आले होते, आज हीच रुग्णसंख्या 4 हजारांच्याजवळ पोहोचलीय. मुंबईत एका दिवशीची आजची पॉझिटीव्हीटी 8.48 एवढी आहे. ठाण्याची 5.25, रायगड 4, पुण्याची 4.14 याचा अर्थ असा आहे की, 100 टेस्टमागे 5 ते 8 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. आजची परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्स आणि इतरांनी जी चर्चा केली. यावरुन अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेणार आहेत. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. असं टोपे म्हणाले. (Restrictions in Maharashtra)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी म्हटलं आहे. टेस्टींग संदर्भात एचडीटीएफ कीटचा वापर करण्याचे ठरले आहे. लसीकरणाबाबतही (Vaccination) निर्णय घेण्यात आला असून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी, शाळा किंवा कॉलेज बंद न करता विशेष मोहिमेतून त्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Web Title :- Restrictions in Maharashtra | mumbais positivity rate 848 rajesh tope has-clearly stated about restrictions corona and omicron covid

 

 

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

 

Sharad Pawar | विधानसभा अध्यक्षांची निवडणुक कोणी पुढे ढकलली?, शरद पवारांनी सांगितलं – ‘माझा हात फार लांब आणि…’

 

Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेकमे आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?

The post Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article