Header

Sharad Pawar | विधानसभा अध्यक्षांची निवडणुक कोणी पुढे ढकलली?, शरद पवारांनी सांगितलं – ‘माझा हात फार लांब आणि…’

Sharad Pawar | विधानसभा अध्यक्षांची निवडणुक कोणी पुढे ढकलली?, शरद पवारांनी सांगितलं – ‘माझा हात फार लांब आणि…’

Sharad Pawar | who postponed election assembly speaker sharad pawar tell himself
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा अध्यक्ष (Legislative Assembly) निवडीवरुन महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) विरुद्ध राजभवन (Raj Bhavan) असा संघर्ष टोकाला पोहोचला होता. दोघांमध्ये घटनात्मक अधिकारांवरुन निर्माण झालेल्या वादात ही निवडणूक होऊ शकली नाही. या मुद्यावरुन विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीसंदर्भात आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. एका मुलाखीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

सोमवारी विधिमंडळात वेगवान हालचाली झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पत्र पाठवून अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे आमने सामने आल्याचे पाहायला मिळालं. गुप्त मतदानाला मूठमाती देऊन आवाजी मतदानाने निवडणूक घेणे हे घटनाबाह्य ठरेल असा इशारा देणारे पत्र राज्यपालांनी दुपारी सरकारला पाठवले. निवडीच्या कार्यक्रमाला राज्यपालांची अनुमती सरकारने प्रस्तावाद्वारे मागितली. मात्र सोमवारी रात्रीपर्यंत राज्यपालांची अनुमती मिळाली नसल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सल्ल्यावरुन ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा मंगळवारी होती. त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

शरद पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीवरुन मंगळवारी पेचप्रसंग होता. मात्र, ही निवडणूक (Election) पुढे ढकलण्यात आली, यामागे शरद पवारांचा हात असल्याची चर्चा होती. पण, महाराष्ट्रात काहीही घडलं की यामागे शरद पवारांचा हात आहे, अशी चर्चा रंगते. माझा हात फार लांब आणि तो कुठेही जातो, असं दिसतंय. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. पण, असं करा, किंवा तसं करा, असे मी म्हणालो नाही, असेही पवारांनी स्पष्ट सांगितले.

 

 

Web Title :- Sharad Pawar | who postponed election assembly speaker sharad pawar tell himself

 

 

Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

 

Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari | मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ पत्रावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तीव्र नाराजी

 

Mukesh Ambani Reliance | मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे उद्योग जगताचे लक्ष

The post Sharad Pawar | विधानसभा अध्यक्षांची निवडणुक कोणी पुढे ढकलली?, शरद पवारांनी सांगितलं – ‘माझा हात फार लांब आणि…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article